Who Is Rubina Francis : रुबीना फ्रांसिसने एयर पिस्टल एसएच 1 च्या फायनलमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली. रुबीना ही पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला पिस्टल नेमबाज ठरली. रुबिनाच्या पदकामुळे आता भारताच्या खात्यात एकूण 5 पदकांचा समावेश झाला आहे. रुबीना फ्रांसिस हीचा इथपर्यंतचा प्रवास हा सोप्पा नव्हता, अतिशय कठीण परिस्थितीशी झुंज देऊन ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.
रुबीना फ्रांसिस ही मध्य प्रदेशातील जबलपूरच्या मॅकेनिकची मुलगी असून तिचा जन्म 25 जून 1999 रोजी झाला होता. रुबीना जन्मजातच एका पायाने दिव्यांग होती. दिग्गज भारतीय नेमबाज गगन नारंग यांच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीने प्रेरित होऊन तिने नेमबाजीत करिअर करण्याचे ठरवले. रुबीना हिचे वडील सायमन यांना सुरुवातीला मुलीला नेमबाजीचे साहित्य खरेदी करून देण्यासाठी अनेक आर्थिक अडचणी आल्या. 2017 मध्ये गन फॉर ग्लोरी या अकॅडमीने रुबीनाचं प्रतिभा पाहून तिला आपल्या अकॅडमीत ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रशिक्षक जय प्रकाश नौटियाल यांच्या मार्गदर्शनाखाली रुबीना आणखीन ट्रेंड झाली त्यामुळे तिची एमपी शूटिंग अकॅडमीमध्ये निवड झाली. तेथे प्रसिद्ध प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या कौशल्याला आणखीन वाव मिळाला यानंतर तिने पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
हेही वाचा : U-19 वर्ल्ड कप नाही खेळू शकणार राहुल द्रविडचा मुलगा, 'या' कारणाने स्वप्न अपूर्णच राहणार
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रुबिनाच्या यशामुळे प्रशिक्षक जेपी नौटियाल यांना फार आनंद झाला. त्यांनी बोलताना म्हंटले की, " आम्ही रुबीना हिला बसून टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ते योग्य नव्हते. या समस्येने त्रस्त असलेल्या रुबीनाला नेमबाज बनण्याचे स्वप्न अधुरं सोडावं लागेल असं वाटतं होतं, परंतू अखेर तिच्या समस्येवर तोडगा काढला. आम्ही तिला उभं राहूनच नेमबाजी करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि त्यासाठी खास शूज आणले त्यामुळे तिचा तोल सांभाळता आला".
पॅरालिम्पिक 2020 : पी2 - 10 मीटर एअर पिस्टल - सातव स्थान
एशियन पॅरा गेम्स 2022 : पी2 - 10 मीटर एअर पिस्टल - कांस्य पदक
ओसिजेक वर्ल्ड कप 2023 - रौप्य पदक (पी2 - 10 मीटर एअर पिस्टल) आणि कांस्य पदक (पी5 - मिश्रित 10 मीटर एअर पिस्टल)
चांगवोन वर्ल्ड कप 2023 - 2 रौप्य पदक (पी2 (टीम) - 10 मीटर एअर पिस्टल आणि पी5 - मिश्रित 10 मीटर एअर पिस्टल) आणि कांस्य पदक (पी2 - 10 मीटर एअर पिस्टल)
चांगवोन वर्ल्ड कप 2022 - रौप्य पदक (पी2 (टीम) - 10 मीटर एअर पिस्टल) आणि 2 कांस्य पदक (पी2 - 10 मीटर एयर पिस्टल आणि पी6 मिश्रित टीम)