मुंबई : नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून संपूर्ण देशाला आनंदी केले. त्याच्या दमदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक झालं. नीरज चोप्राने पहिल्या थ्रोमध्ये भाला 87.03 मीटर फेकला आणि 87.58 मीटरने सुधारा पण तो पुढे जाऊ शकला नाही. नीरजने 87.03 मीटर, 87.58 मीटर, 76.79 मीटर आणि 84.24 चे चार वैध थ्रो व्यवस्थापित केले तर त्याचे चौथे आणि पाचवे थ्रो अपात्र ठरले.
त्याने या खेळासाठी वापरलेला भाला देखील कमालीचा चर्चेत आहे. फार कमी लोकांना या खेळाबद्दल संपुर्ण माहिती आहे. त्यात भाल्याचं वजन किती असतं याबाबत देखील अनेकांना प्रश्न आहे.
एथलेटिक्समध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. पण नीरजने फेकलेल्या भाल्याचे वजन किती होते? हे आपण जाणून घेणार आहोत.
नीरज चोप्राच्या भाल्याच्या वजनाबद्दल बोलायचं झालं तर, ऑलिम्पिक खेळांच्या नियमांनुसार, भालाफेकमध्ये पुरुष आणि महिलांच्या भालाफेकचे वजन निश्चित केले जाते.
नीरजने फेकलेल्या भाल्याचं वजन
पुरुषांच्या भालाफेकमध्ये भाल्याची लांबी 2.6 आणि 2.7 मीटर दरम्यान असते. त्याचे वजन 800 ग्रॅम आहे. तर महिलांसाठी भाल्याचे वजन 600 ग्रॅम आणि लांबी 2.2 ते 2.3 मीटर आहे.
नीरजने फेकलेल्या भाल्याची किंमत
आता नीरज चोप्राच्या भाल्याच्या किंमतीबद्दल बोलूया, जो फेकून त्याने देशाला एथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या एका भाल्याची किंमत सुमारे 1.10 लाख रुपये इतकी आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) च्या मते, नीरज चोप्राकडे असे 4 भाले आहेत, ज्याने तो सतत सराव करत होता. या चौघांची एकूण किंमत 4.35 लाखांपेक्षा अधिक होती.
नीरजला करावा लागला एवढा खर्च
भारतीय आणि इतर प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने नीरज चोप्राचा सराव, प्रशिक्षण, उपचार आणि इतर सुविधांवर 7 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकपासून SAI ने लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) अंतर्गत नीरज चोप्रावर 52.65 लाख रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर ACTC अंतर्गत 1.29 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.