IND vs WI 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने (West Indies) टॉस जिंकला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाच टी-ट्वेंटी सिरीजमध्ये वेस्ट इंडिजने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता मालिकेतील रोमांच आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय. आता आजचा सामना (IND vs WI 4th t20) जिंकून सामन्यात बरोबरी करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
मागील सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील सलामीवीर ईशान किशनला संधी मिळाली नाही. सलामीसाठी भारताकडे यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ऋषभ पंतनंतर विकेटकिपर म्हणून ईशान किशनकडे पाहिलं जातंय. मात्र, आता ईशानला संधी मिळणार नसल्याने वर्ल्ड कप स्कॉडमध्ये त्याला संधी मिळणार की नाही? यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे.
आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. खेळपट्टीच्या मूडमध्ये काही बदल होईल, असं मला वाटत नाही. याआधीच्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी धमाकेदार कामगिरी केली. त्यामुळे आम्ही कोणताही बदल न करता मैदानात उतरलो आहोत, असं पांड्या म्हणाला.
A look at #TeamIndia's Playing XI for the 4th #WIvIND T20I
Follow the match
— BCCI (@BCCI) August 12, 2023
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (WK), रोव्हमन पॉवेल (C), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, ओबेद मॅककॉय
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (C), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.