मुंबई : अफगाणिस्तानने मंगळवारी बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांची सिरीज टी-20 सिरीजमधील दुसरा सामना 6 विकेटने जिंकला आहे. अफगाणिस्तानने सिरीज देखील जिंकली आहे. याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात देखील अफगाणिस्तानने विजय मिळवला होता. स्पिनर राशिद खान दोन्ही सामन्यांचा हिरो ठरला.
अफगाणिस्तान खूप जलद गतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर येत आहे. अफगाणिस्तानमध्ये लोकं गरीब आहेत. खेळांसाठी तेथे पोषक वातावरण नाही. तरी देखील क्रिकेट टीमची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून नाव कमवलं आहे. राशिद खान आणि मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान या सारख्या खेळाडूंनी जगाचं लक्ष त्यांच्याकडे आकर्षित केलं आहे.
अफगाणिस्तानचा स्पिनर शराफुद्दीन अशरफने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटलं की, 'आमच्या टीममध्ये असा कोणता खेळाडू नाही आहे ज्याने अडचणींचा सामना नाही केला. प्रत्येकाची कहानी भारताचा खेळाडू धोनीच्या कहानीशी मिळती जुळती आहे. आमच्या टीममधल्या प्रत्येक खेळाडूवर सिनेमा बनू शकतो. आमच्याकडे 11 धोनी आहेत.'