मुंबई: देशात कोरोनाचा प्रकोप होत आहे. तर दुसरीकडे म्युकरमायकोसिस आणि कोरोनातून बरे होणाऱ्यांना इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. देशात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कुठे ऑक्सिजनची कमतरता तर कुठे बेड्सची कमी अशा परिस्थितीत अनेक स्तरांमधून मदतीचा हात पुढे येत आहेत. सध्या सोशल मीडियावर अत्यंत वेदनादायी फोटो व्हायरल होत आहे.
आईला ऑक्सिजन लावलेला असताना ती घरातील सगळी कामं करते आहे. हा फोटो डोळ्यात अश्रू आणणारा आहे. आई इतकी आजारी असतानाही त्या परिस्थितीत कुटुंबासाठी सर्व करते आहे. हे पाहून मन हेलावून जातं सुन्न होतं. या आईसाठी आता विरेंद्र सेहवागनं मदतीचा हात पुढे केला आहे.
Maa Maa hoti hai. Tears seeing this
We too have been overwhelmed with many calls for Oxygen concentrators in Delhi that we are providing on a rotational basis.Trying to fulfill as much as possible.If you need one,please send a whatsapp msg by clicking on https://t.co/864Z2fX4Ny pic.twitter.com/oKBoAizIB0
— Virender Sehwag (@virendersehwag) May 23, 2021
If anyone can please provide her contact details, please DM @AmritanshuGupta @SehwagFoundatn we want to take care of meals for her and her family till she recovers. https://t.co/o9Kq9p1BPY
— Virender Sehwag (@virendersehwag) May 23, 2021
वरेंद्र सेहवागनं व्हायरल झालेल्या या फोटोला ट्वीट करत त्या आईचा नंबर आणि पत्ता देण्याचं आवाहन केलं आहे. या महिलेच्या घरी ती बरी होईपर्यंत जेवण पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल असंही त्याने ट्वीटरवर सांगितलं आहे.
24 मे 2021 पर्यंत भारतात कोरोनव्हायरसमुळे आतापर्यंत 3 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून देशात कोरोना मोठ्या वेगानं पसरू लागला आणि त्यानंतर हजारो रुग्णांचा जीव या कोरोनानं घेतला. कोरोनाची दुसरी लाट तर फारच भयंकर आहे. गेल्या 24 तासांत 2.22 लाख नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर 4,454 लोकांचा मृत्यू झाला आहे.