भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा अर्ज, टॉम मूडीही शर्यतीत

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंदर सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केलाय.

Updated: Jun 1, 2017, 07:42 PM IST
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा अर्ज, टॉम मूडीही शर्यतीत title=

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंदर सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केलाय.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी संपतोय. त्यामुळे या पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. प्रशिक्षपदाच्या शर्यतीत सेहवागसह ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी आणि इंग्लंडचे रिचर्ड पेब्स यांचाही समावेश आहे. 

तसेच भारताची माजी वेगवान गोलंदाज दोडा गणे आणि लालचंद राजपूत यांनी या पदासाठी अर्ज दाखल केलाय. दरम्यान, सेहवागने या पदासाठी अर्ज दाखल केल्याने यासाठीची रंगत अधिक वाढलीये. 

बीसीसीआयने सेहवागला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. दरम्यान, आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटरवगळता सेहवागकडे प्रशिक्षणाचा तितकासा अनुभव नाहीये.