Virat Kohli : अनुष्का नव्हे तर 'या' अभिनेत्रीसोबत विराटचा व्हिडीओ होतोय व्हायरल, काय आहे दोघांचं कनेक्शन?

Virat Kohli : आता टीम इंडियाचा ( Team India ) स्टार खेळाडू विराट कोहलीचा ( Virat Kohli ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये तो एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत स्पॉट झाला. दरम्यान या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालीये.

सुरभि जगदीश | Updated: Sep 11, 2023, 08:27 AM IST
Virat Kohli : अनुष्का नव्हे तर 'या' अभिनेत्रीसोबत विराटचा व्हिडीओ होतोय व्हायरल, काय आहे दोघांचं कनेक्शन? title=

Virat Kohli : सध्या टीम इंडिया ( Team India ) श्रीलंकेमध्ये असून एशिया कपचे सामने सुरु आहे. 10 आणि 11 सप्टेंबर या दोन्ही दिवशी पाकिस्तान विरूद्ध सामना खेळवण्यात येणार आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रिझर्व्ह डे म्हणजे 11 तारखेला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात सध्या केएल.राहुल आणि विराट कोहली क्रिझवर आहेत. अशातच आता टीम इंडियाचा ( Team India ) स्टार खेळाडू विराट कोहलीचा ( Virat Kohli ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये तो एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत स्पॉट झाला. दरम्यान या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालीये.

एशिया कपनंतर टीम इंडियाला 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप खेळायचा आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित केला असून सर्वांच्या नजरा किंग कोहलीवर ( Virat Kohli ) असणार आहेत. अशातच वर्ल्डकप 2023 चा प्रोमो शूट करण्यात आलाय. ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल दिसून येतायत. 

विराटने अभिनेत्री शहनाज गिलसोबत केला प्रोमो शूट

विराट कोहली जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. वर्ल्ड कप 2023 प्रोमो शूटच्या बिहाइंड द सीन्स व्हिडिओमध्ये विराट कोहली ( Virat Kohli ) शूटिंग करताना खूप मजा करताना दिसतोय. यावेळी विराटसोबत शहनाज गिल असून ती काही विचित्र स्टंट करताना दिसतेय. हे प्रोमो शूट स्टार स्पोर्ट्सचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान विराट कोहली ( Virat Kohli ) आणि शहनाज गिलला ( Shehnaaz Gill ) एकत्र पाहून चाहते मात्र खूप उत्साहित झाले आहेत.

वर्ल्डकप जवळ असून स्टार स्पोर्ट्सने नवा प्रोमो बनवण्याचा विचार केला असण्याची शक्यता आहे. प्रोमोसाठी त्यांनी विराट कोहली ( Virat Kohli ) किंवा शहनाज गिलला ( Shehnaaz Gill ) हायर केलं असण्याची शक्यता आहे. असं असल्यास चाहत्यांना विराट कोहली आणि शहनाज वर्ल्ड कप 2023 च्या नवीन प्रोमोमध्ये दिसू शकतात. दरम्याना याचा झी 24 तास दावा करत नाहीये.

वर्ल्डकप टीमचा भाग आहे विराट

नुकंतच वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी 15 सदस्यीय भारतीय टीममध्ये विराट कोहलीचा समावेश करण्यात आला. मुख्य म्हणजे विराट हा एकमेव खेळाडू आहे जो 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या टीमचा भाग होता. आगामी वर्ल्डकपमध्ये भारताला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी विराट कोहलीने उत्तम खेळ करावा अशी चाहत्यांची इच्छा आहेय.