पॅरेटिंगबद्दल विराट म्हणतो की...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विवाहबद्ध झाले.

Updated: May 23, 2018, 02:46 PM IST
पॅरेटिंगबद्दल विराट म्हणतो की... title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विवाहबद्ध झाले. लग्न, हनीमून यानंतर अनुष्का आपल्या सिनेमांमध्ये तर विराट आपल्या खेळात व्यस्त झाला. 
सध्या विराट त्याच्या या विधानामुळे चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. विराटाच्या यशामागे आहे त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा. तिला तो लेडी लक मानतो. इतकंच नाही तर ऑन फिल्ड जरी तो कर्णधार असला तरी ऑफ फिल्ड अनुष्का त्याची कर्णधार असल्याचे त्याने जाहिरपणे कबुल केले आहे. त्याचा ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.

अनुष्काबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित नसतील...

लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. आयपीएलदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत विराटने अनुष्काबद्दल काही गोष्टी सांगितल्या. या गोष्टी अनेकांना माहिती नसतील. करिअरच्या सुरुवातीच्या काळात विराट कोहली खूप रागीट असल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. पण आता त्याच्यातील बदलही आपण अनुभवत आहोत. याबद्दल तो म्हणतो, गेल्या काही वर्षांपासून मी अनुष्कासोबत अनेक गोष्टींचा अनुभव घेतला आहे. जो मी यापूर्वी कधीही घेतला नव्हता. ती खूप धार्मिक आहे आणि त्यामुळेच माझ्यात खूप पॉजिटिव्ह बदल झाले आहेत.

विराट म्हणतो...

आपल्या करिअरबद्दल बोलताना विराट म्हणाला की, मला माहित आहे की, ही प्रसिद्धी आणि सर्व काही नेहमीच असे नसेल. हे एक दिवस संपून जाईल. पण मलाही माझे खाजगी आयुष्य आहे. कुटुंब आहे. माझीही मुले असतील. त्यांना माझ्यासोबत वेळ घालवण्याचा हक्क असेल. म्हणून एक गोष्ट माझ्या डोक्यात स्पष्ट आहे. माझी अशी इच्छा आहे की, माझ्या सर्व ट्रॉफीज, अचीवमेंट्स काहीही माझ्या घरात नसाव्यात. माझी मुले मोठी होताना त्यांना हे एका सेलिब्रेटीचे घर आहे, याची जाणीव मला होऊ द्यायची नाहीये.