मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली बुधवारी हेमिल्टनमध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी-२० मध्ये २५ रन करताच एक नवा रेकॉर्ड बनवणार आहे. विराट कोहली जर आज २५ रन करतो तर कर्णधार म्हणून टी-२० सामन्यांमध्ये तो माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या पुढे निघून जाईल.
कोहली टी-२० सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे. धोनी या यादीत १११२ रनसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ११४८ रनसह दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॉफ डु प्लेसिस १२७३ रनसह पहिल्या स्थानावर आहे.
कोहलीने जर आज २५ रन केले तर टी२० मध्ये सर्वाधिक रन करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरेल. विराट कोहलीने आतापर्यंत १०८८ रन केले आहेत.
टी-20 मध्ये सर्वाधिक रन करणारे खेळाडू
विराट कोहली - 2745
रोहित शर्मा - 2648
मार्टिन गप्टिल - 2499
शोएब मलिक - 2321
ब्रेंडन मॅक्कुलम - 2140
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांच्या सीरीजमधली तिसरी मॅच आज हेमिल्टनच्या सेडॉन पार्कवर रंगणार आहे. जर आजचा सामना भारताने जिंकला तर भारत न्यूझीलंडच्या धरतीवर इतिहास रचणार आहे. न्यूझीलंडच्या धरतीवर पहिल्यादा टी-20 सीरीज जिंकण्य़ाची संधी आहे. भारत या सीरीजमध्ये २-० ने आघाडीवर आहे.