Asia Cup 2022 : Virat Kohli चे कमबॅक, झळकावलं दमदार शतक

विराट कोहलीने दमदार शतकासह कमबॅक केलं आहे. त्याने आपल्या करिअरमधलं पहिलं टी20 शकत ( Virat kohli first T20 Century) झळकावलं आहे.

Updated: Sep 8, 2022, 09:16 PM IST
Asia Cup 2022 : Virat Kohli चे कमबॅक, झळकावलं दमदार शतक title=

मुंबई : विराट कोहलीने आशिया कपमध्ये आपलं पहिलं शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे फक्त 53 बॉलमध्ये त्याने शतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 11 फोर आणि 4 सिक्स ठोकले. विराटच्या बॅटने तब्बल 1 हजार 20 दिवसानंतर शतक आलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोहलीच्या या शतकामुळे चाहत्यांनी ही त्यांचं कौतूक केलं आहे. (Virat Kohli Hit first Century in Asia Cup 2022)

विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यापासून मैदानावर संघर्ष करताना पाहायला मिळत होता. त्याने याआधी अर्धशतकं झळकावली होती. पण आज त्याने शतक झळकावत टीकाकरांना उत्तर दिले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे त्याचं पहिलं टी20 शतक आहे. आशिया कप 2022 मधलं देखील हे पहिलं शतक आहे. विराट कोहलीच्या नावावर याआधी वनडे आणि टेस्ट मिळून 70 शतकं होती. आता टी20 मध्ये पहिलं शतक झळकावल्या नंतर त्याच्या नावावर 71 शतकांची नोंद झाली आहे.

विराट कोहलीने अफगाणिस्तान (Ind vs Afg) विरुद्ध 61 बॉलमध्ये 122 रनची नाबाद खेळी केली.