विराटच्या नावावर नवा रेकॉर्ड, अजहरुद्दीन आणि गेलला टाकलं मागे

जोहान्सबर्ग येथे झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये विराटने ७५ रन्सची इनिंग खेळत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 11, 2018, 08:07 PM IST
विराटच्या नावावर नवा रेकॉर्ड, अजहरुद्दीन आणि गेलला टाकलं मागे  title=
Image: BCCI

मुंबई : रेकॉर्ड्सचा पाऊस पाडणाऱ्या टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आफ्रिकेच्या मैदानात धडाकेबाज बॅटिंग करत आहे. जोहान्सबर्ग येथे झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये विराटने ७५ रन्सची इनिंग खेळत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.

राहुल द्रविड ही पडला मागे

विराटने ७५ रन्सची इनिंग खेळत परदेशात सर्वाधिक रन्स बनवणारा भारतीय कॅप्टन बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड भारतीय टीमचा माजी कॅप्टन राहुल द्रविडच्या नावावर होता.

पाचवा भारतीय खेळाडू 

७५ रन्सच्या इनिंगसोबत विराट कोहली वन-डे मध्ये सर्वाधिक रन्स बनवणारा पाचवा भारतीय खेळाडू बनला आहे. या लिस्टमधील भारतीय टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अजहरुद्दीन आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांना विराटने मागे टाकलं आहे.

अजहरुद्दीन आणि गेलचा विक्रम मोडला

विराटने आतापर्यंत २०६ वन-डे मॅचेसमध्ये ९४२३ रन्स केले आहेत. मोहम्मद अजहरुद्दीनने वन-डे मध्ये ९३७८ रन्स केले आहेत. ख्रिस गेलने वन-डे मध्ये आतापर्यंत ९४२० रन्स केले आहेत.

सर्वाधिक रन्स बनवण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर

दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये ७५ रन्सची इनिंग खेळली. यासोबतच विराट देशातील पाचवा आणि जगातील १६ वा सर्वाधिक रन्स बनवणारा खेळाडू बनला आहे. वन-डे मध्ये सर्वाधिक रन्स बनवण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 

सचिन तेंडुलकरने आपल्या करिअरमधअये १८,४२६ रन्स बनवले आहेत. त्यानंतर सौरव गांगुलीने ११,३६३ रन्स, द्रविडने १०,८८९ आणि महेंद्र सिंग धोनीने ९,९५४ रन्स बनवले आहेत. 

विराट कोहली आणि धोनी यांच्या रन्समध्ये जास्त अंतर नाहीये. विराटचा फॉर्म पाहता तो लवकरच धोनीचा रेकॉर्ड तोडेल असं दिसत आहे.