सेंचुरियन: सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारी भारतीय टीम आज दुसरा टी20 सामना खेळणार आहे.
भारतीय टीमचा कर्णधार आजच्या सामन्यात खेळेल अशी माहिती मिळते आहे. कर्णधार विराट कोहली मॅचपर्यंत फिट होईल असं बोललं जातंय. मागच्या सामन्यात विराटला दुखापत झाली होती. पण त्यानंतर ही त्याने शतक ठोकलं होतं. दुखापत गंभीर नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे विराट टॉससाठी मैदानात येईल अशी शक्यता आहे.
कोहलीला डरबनमधील पहिल्या वनडेमध्ये देखील गुडघ्याला दुखापत झाली होती. पण तेव्हा ही त्याने शतक ठोकलं होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये जर आज भारताने विजय मिळला तर कोहली केपटाउनमधल्या तिसऱ्या सामन्यात विश्रांती घेऊ शकतो. कारण पुढे ३ महिने देखील तो व्यस्त असणार आहे. कोहलीच्या जागी के एल राहुलला संघात स्थान मिळू शकतं. मागच्या सामन्यात राहुलच्या ऐवजी पांडेला संधी देण्यात आली होती.
आज ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. तर आफ्रिकेचा संघ देखील विजयासाठी करो वा मरो असा प्रयत्न करेल. भारतीय टीमने जोहान्सबर्गमध्ये पहिला टी20 सामना 28 रनने जिंकला होता. आज जर पुन्हा टीम इंडियाने हा सामना जिंकला तर 8 दिवसात भारत दुसऱ्यांदा इतिहास रचणार आहे.