मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे. विराट कोहलीच्या ५४ बॉलमध्ये केलेल्या ८२ रन्स आणि मनिष पांडेच्या नाबाद ५१ रन्समुळे भारतानं १७२ रन्सं आव्हान पार केलं.
या विजयी खेळीनंतर कोहली टी-20 क्रिकेटमध्ये रन्सचा पाठलाग करताना सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू बनला आहे. विराट कोहलीनं न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅक्कलमचं रेकॉर्ड मोडलं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये रन्सचा पाठलाग करताना कोहलीच्या नावावर १०१६ रन्स आहेत. तर ब्रॅन्डन मॅक्कलमनं १००६ रन्स बनवलेत.
मॅक्कलमनं १००६ रन्स ३८ इनिंगमध्ये आणि ३३.५३ च्या सरासरीनं बनवल्या आहेत. तर कोहलीनं फक्त २१ इनिंग आणि ८४.६६च्या सरासरीनं १०१६ रन्स बनवल्यात.
याचबरोबर रन्सचा पाठलाग करताना मागच्या दहा इनिंगमध्ये कोहलीनं ८२, ८२ नाबाद, ५५ नाबाद, ४१ नाबाद, ५६ नाबाद, ४९, ५०, ७२ नाबाद, ५७ नाबाद आणि ५४ अशा रन्स बनवल्या आहेत.
विराट कोहली टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा भारतीय बनला आहे. टी २० मध्ये कोहलीच्या नावावर आता ६,९०७ रन्स आहेत. रैनाचं ६,८७२ रन्सचं रेकॉर्ड कोहलीनं मोडलं आहे. टी २० मध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट आठव्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली - १०१६ रन्स
ब्रॅन्डन मॅक्कलम- १००६ रन्स
डेव्हिड वॉर्नर- ८९२ रन्स
मार्टिन गप्टील- ८८२ रन्स
मोहम्मद शहजाद- ८१९ रन्स
India's @imVkohli has passed @Bazmccullum to become the highest scorer in the second innings of T20Is - and look at that average! #howzstat pic.twitter.com/bHfShz0Cgp
— ICC (@ICC) September 7, 2017