T20 World Cup: कोणत्या बड्या खेळाडूवर मात करत विराटनं मारली बाजी?

 टी-20 साठी कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला वर्ल्डकप आहे.

Updated: Oct 29, 2021, 03:11 PM IST
T20 World Cup: कोणत्या बड्या खेळाडूवर मात करत विराटनं मारली बाजी? title=

दुबई : T20 विश्वचषक 2021साठी 31 ऑक्टोबरची रात्र टीम इंडिया आणि न्यूझीलंड टीम्ससाठी मोठा दिवस असणार आहे. हा महत्त्वाचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीतील स्थान पक्क करेल. तर पराभूत संघाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका अधिक असतो. दरम्यान आयसीसी स्पर्धांमध्ये किवींनी नेहमीच भारतावर वर्चस्व राखलं आहे. मात्र T20 फॉरमॅटमध्ये विलियम्सन नाही तर विराटचं वर्चस्व दिसून येतं.

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, विराट कोहली आणि केन विल्यमसन यांनी आतापर्यंत सहा वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. यामध्ये विराटने चार वेळा सामना जिंकला आहे. तर विलियम्सनला कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला फक्त एकदाच पराभूत करण्यात यश आलं आहे. 

कोहलीची विजयाची टक्केवारी 66.7 आहे तर विलियम्सनची विजयाची टक्केवारी फक्त 16.7 आहे. त्यामुळे विलियम्सन समोर कर्णधार म्हणून कोहलीचं वर्चस्व दिसून येतं. फक्त हा विक्रम विराटला 31 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कायम राखावा लागणार आहे.

दरम्यान टी-20 साठी कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला वर्ल्डकप आहे. भारतीय टीमने आतापर्यंत कधीच टी-20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला कधीच मात दिली नाहीये. आतापर्यंत टी-20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड आणि भारत दोनवेळा आमनेसामने आले आहेत. आणि या दोन्हीवेळी न्यूझीलंडने बाजी मारली आहे. आयसीसी इन्वेंट्समध्ये 2003 मध्ये भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता.