मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनं आयपीएलमध्ये सुरु असलेल्या कॉमेंट्रीवर टीका केली आहे. संजू सॅमसनच्या घरगुती आणि आयपीएलमधल्या कामगिरीवर कॉमेंटेटर्स खूपच बोलत आहेत. दुसऱ्या विषयांवर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही, असं दिसतंय. हे खूपच कंटाळवाणं आहे, असं ट्विट विनोद कांबळीनं केलं आहे. घरगुती क्रिकेटमध्ये नेमकं काय चाललं आहे. आणि कोणत्या खेळाडूंची कामगिरी कशी आहे याबद्दल कॉमेंटेटर्सना काहीच कल्पना नसल्याचं कांबळी म्हणाला आहे. याचबरोबर विनोद कांबळीनं संजू सॅमसनला खुलं आव्हान दिलं आहे. आयपीएलच्या या मोसमामध्ये संजू सॅमसननं शतक मारून दाखवावं, असं ट्विट कांबळीनं केलं आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थानकडून खेळणाऱ्या संजू सॅमसननं ६ मॅचमध्ये सर्वाधिक २३९ रन बनवले आहेत. सर्वाधिक रन करणाऱ्या क्रिकेटपटूला देण्यात येणारी ऑरेंज कॅपही सध्या संजू सॅमसनकडेच आहे.
#IPL2018. The amount of talking going on by the Commentators about#Sanju Samson about his domestic season and IPL season like they don't have anything else to talk about. So boring
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) April 22, 2018
First of all the Commentators does not have any clue about our Indian player and their current performancesin the domestic sessions
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) April 23, 2018
I openly challenge him if you people say that he is a class player then I want to see him getting a hundred or for how long will he keep his orange cap in IPL. If he does it then I will say that he is got something special. All the best Sanju Samson https://t.co/JoCAfViKcG
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) April 23, 2018