सचिन तेंडुलकरमुळे विनोद कांबळी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी शारदाश्रम शाळेपासून अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळली. 

Updated: Jan 3, 2018, 01:55 PM IST
सचिन तेंडुलकरमुळे विनोद कांबळी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात  title=

मुंबई : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी शारदाश्रम शाळेपासून अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळली. 

सचिन आणि विनोदने रमाकांत आचरेकरांकडे क्रिकेटचे धडे घेतले. पुढे सचिन  आणि विनोदने त्यांच्या खेळावर मेहनत घेतली. 

सचिन विनोदची मैत्री 

रमाकांत आचरेकर  सरांच्या तलमीमध्ये दोघेही तयार झाले. सुरूवातीच्या काळात विनोदचा खेळ हा सचिनपेक्षा अव्वल होता. मात्र त्यामध्ये सातत्य न राखल्याने कालांतराने विनोद  क्रिकेटच्या मैदानात फारशी कमाल दाखवू शकला नाही. 

विनोदने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कॉमेट्री देण्यास सुरूवात केली. काही कार्यक्रमांमध्ये त्याने क्रिकेट तज्ञ म्हणून काम केले. 

रिएलिटी शोदरम्यान विनोद - सचिनच्या मैत्रीत खंड  

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या मैत्रीमध्ये एका रिएलिटी शोमुळे तणाव निर्माण झाल्याचे काहींचे म्हणणे होते. पण नुकत्याच एका क्रिकेटवर आधारित पुस्तकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा सूर जुळले.  

क्रिकेट कोच  म्हणून नवी इनिंग  

क्रिकेट कोच  म्हणून विनोद कांबळी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात आला आहे. विनोदने वांद्रे परिसरात अकॅडमी सुरू केली आहे. क्रिकेटपासून दूर गेल्यानंतरही क्रिकेटबाबतचे माझे प्रेम तसेच  होते. सचिन तेंडुलकरने माझ्यातील क्रिकेट प्रेमाला आणि आचरेकर सरांनी दिलेल्या मौल्यवान ठेव्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी प्रेरणा दिल्याचे विनोदने सांगितले आहे. सचिनच्या सल्ल्यानुसार मी नव्या पिढीला क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी नवी अकॅडमी सुरू करत असल्याचे सांगितले आहे.