Vinesh Phogat : भारतात परतताच विनेश फोगटला अश्रू अनावर, साक्षी आणि बजरंगने दिला धीर Video

शनिवारी विनेश पॅरिसवरून दिल्ली एअरपोर्टला लँड झाली, याठिकाणी तिचे जोरदार स्वागत झाले. देशवासीयांनी दिलेलं प्रेम पाहून विनेश फार भावुक झालेली पाहायला मिळाली. 

Updated: Aug 17, 2024, 12:44 PM IST
Vinesh Phogat : भारतात परतताच विनेश फोगटला अश्रू अनावर, साक्षी आणि बजरंगने दिला धीर Video  title=
(Photo Credit : Social Media)

Vinesh Phogat Grand Welcome In India : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिचे भारतात आगमन झाले आहे. 17 ऑगस्ट शनिवारी विनेश पॅरिसवरून दिल्ली एअरपोर्टला लँड झाली, याठिकाणी तिचे जोरदार स्वागत झाले. देशवासीयांनी दिलेलं प्रेम पाहून विनेश फार भावुक झालेली पाहायला मिळाली. यावेळी विनेशचे कुटुंब तसेच कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे सुद्धा तिच्या स्वागतासाठी हजर होते. विनेश भावुक झाल्यावर साक्षी आणि बजरंग यांनी तिला धीर दिला, सध्या तिच्या भारतातील आगमनाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.  

विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून मेडल न घेता रिकाम्या होतीच भारतात परतावं लागलं. ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिला रौप्य पदक तरी देण्यात यावे यासाठी क्रीडा लवादाकडे याचिका करण्यात आलेली होती. मात्र ही याचिका क्रीडा लवादाने फेटाळली. विनेश ही भारताची पहिली कुस्तीपटू आहे, जिने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. 

 

 हेही वाचा : Vinesh Phogat : 2023 पर्यंत खेळणार... निवृत्तीच्या निर्णयावरून विनेश फोगटचा यूटर्न? भावनिक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?

 

 

 

 

अपात्र ठरल्यावर विनेशला भारताकडून खूप सपोर्ट मिळाला. दिल्ली एअरपोर्टवर आगमन होताच विनेशचे चाहते तिचे मित्र या सर्वांनी तिचे जंगी स्वागत केले. हे पाहून विनेशला अश्रू अनावर झाले आणि ती कुस्तीपटू साक्षी मलिक हिला मिठी मारून रडू लागली. यावेळी विनेशच्या अश्रूंचा बांध फुटला. साक्षी मलिकने तिचे अश्रू पुसले तर बजरंग पुनियाने तिला धीर दिला. 

विनेशच्या स्वागतासाठी आलेले कुस्तीपटू काय म्हणाले? 

2016 ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने सांगितले की, "विनेशने देशासाठी जे केले ते फार कमी लोक करतात. तिला यासाठी अधिक आदर आणि कौतुक मिळायला हवे...".  तर कुस्तीपटू बजरंग पुनिया याने म्हंटले, "देशवासी तिला प्रचंड प्रेम देत आहेत, देश तिचे कसे स्वागत करतोय हे  तुम्ही पाहू शकता".  कुस्तीपटू सत्यवर्त कादियानने म्हंटले की, "विनेश एक फायटर होती, आहे आणि राहील. ती आमच्यासाठी चॅम्पियन आहे आणि आम्ही चॅम्पियनप्रमाणे तिचे स्वागत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आम्ही तिला सुवर्णपदक विजेती मानत आहोत".