मुंबई : जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळालं आहे. भारताची कुस्तीपट्टू विनेश फोगटने ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे दुसर सुवर्ण पदक मिळालं.
कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला यंदाच्या आशियाई स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. ६५ किलो वजनी गटामध्ये बजरंगनं जपानच्या दाईची ताकातानीचा ११-८नं पराभव केला. या मॅचमध्ये सुरुवातीलाच बजरंगनं ६-०ची आघाडी घेतली होती. पण ताकातानीनं मॅच ६-४ अशा रंगतदार अवस्थेमध्ये आणली. पण शेवटी बजरंगनं फायनल पंच मारत ताकातानीला ११-८नं धूळ चारली. बजरंग पुनियानं त्याला मिळालेलं सुवर्ण पदक भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना अर्पण केलं आहे. १६ ऑगस्टला अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं होतं.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने कास्य पदकाची कमाई केली आहे. भारताकडून 10 मीटर एयर राइफल मिक्सडमध्ये अपूर्वी चंदीला आणि रवी कुमार यांना कास्य पदक जिंकलं आहे.