T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूनेच संघाला पाठवले घरी; पाहा अफलातून Video

या खेळाडूने घेतलेला डेव्हिड मिलरचा कॅच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला

Updated: Nov 6, 2022, 12:20 PM IST
T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूनेच संघाला पाठवले घरी; पाहा अफलातून Video title=

T20 World Cup : रविवारची सकाळ ही क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरली आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup 2022)  नेदरलँड्ने (Netherlands) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 13 धावांनी पराभव करत वर्ल्डकप स्पर्धेतून (World Cup 2022) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेदरलॅंड्ने (Netherlands) ग्रुप 1च्या (Group1) शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर भारताला याचा मोठा फायदा झालाय. दक्षिण भारताच्या पराभवानंतर भारतीय संघ (Team India) थेट सेमी फायनलमध्ये (semi final) पोहोचला आहे. (T20 World Cup 2022 Roelof van der Merwe takes david miller catch)

मात्र या सामन्यादरम्यान, डेव्हिड मिलरचा (david miller) झेल हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला आहे. मिलरने 17 चेंडूंमध्ये 17 धावा केल्या. मिलर ब्रॅंडन ग्लोव्हरच्या (Brandon Glover) चेंडूवर बाद झाला. पण त्याला ज्या खेळाडूने त्याचा बाद केले सध्या त्याचीच चर्चा सुरुय. मिलरचा झेल रोलोफ व्हॅन देर मेर्वेने (roelof van der merwe) घेतला. व्हॅन डर मर्वेचा जन्म जोहान्सबर्ग (johannesburg) येथे झाला असून त्याने दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa) आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्यामुळे मेर्वे हा आपल्या आधीच्या संघासाठी घातक ठरला आहे.

हे ही वाचा >> T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्ल्डकपमध्ये चोकर्स का म्हणतात?

ब्रँडन ग्लोव्हरच्या शॉर्ट बॉलवर मिलरने (david miller) चेंडू जोरात हवेत मारला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या व्हॅन देर मेर्वे मागे धावत हा झेल घेतला. हा झेल दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

कोण आहे रोलोफ व्हॅन देर मेर्वे (roelof van der merwe)?

37 वर्षीय अष्टपैलू रोलोफ व्हॅन देर मेर्वेचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला.  व्हॅन देर मेर्वेने 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  फिरकीपटू असलेल्या मेर्वेने दक्षिण आफ्रिकेसाठी 13 एकदिवसीय आणि तितकेच टी-20 सामने खेळले आहेत. 2015 मध्ये, व्हॅन देर मेर्वेला डच पासपोर्ट मिळाला आणि त्याच वर्षी त्याने नेदरलँडच्या संघासाठी पदार्पण केले. व्हॅन देर मेर्वेने आतापर्यंत नेदरलँड्सकडून 36 टी-20 आणि 3 वनडे सामने खेळले आहेत.