सुरेश रैनाच्या 'बिटीया राणी'ची सोशल मीडीयात चर्चा

  खूप दिवसांपासून क्रिकेटपाऊन दूर असलेला क्रिकेटर सुरेश रैना लवकरच क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.

Updated: Jan 9, 2018, 11:51 AM IST
सुरेश रैनाच्या 'बिटीया राणी'ची सोशल मीडीयात चर्चा  title=

मुंबई :  खूप दिवसांपासून क्रिकेटपाऊन दूर असलेला क्रिकेटर सुरेश रैना लवकरच क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.

आयपीएलच्या २०१८ सालच्या हंगामात सुरेश नैना चैन्नई सुपरकिंग  संघातून खेळणार आहे.क्रिकेटच्या मैदानावर रैनाचा खेळ पाहण्याआधी त्याने चाहत्यांना अजून  एक नवं गिफ्ट आणलं आहे. 

रैना गायकाच्या अंदाजामध्ये चाहत्यांसमोर येणार आहे. 

टीझर रसिकांसमोर  

सुरेश रैनाने सोशल मीडियामध्ये गाण्याचं टीझर शेअर केलं आहे. 'बिटिया राणी' असे गाण्याचे शब्द आहेत. गाण्याच्या व्हिडिओत त्याची पत्नी प्रियंका चौधरी आणि मुलगी ग्रेसियादेखिल आहे.रैनाचं हे गाणं रेड एफएमवर ब्रॉडकास्ट होणार आहे. 

सोशल मीडियावर कौतुक  

हरभजन सिंगने रैनाचं कौतुक करताना त्याच्याअवाजाचे कौतुक केले आहे.  

 

इरफान पठाणनेही स्त्रीया आपल्या कुटुंबाच्या,देशाच्या,समाजाच्या  आधार आहेत. सपोर्ट करण्यासाठी जरूर प्रियंकाचा शो ऐका असं आवाहन त्यानं केलं आहे.  

 

सुरेश रैना यापूर्वीदेखील 'मेरठिया गैंगस्टर्स' या चित्रपटामध्ये गायला होता.