ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला सुरुवात झाली आहे. ऍडलेडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताची पहिली विकेट गेल्यानंतर पुजारा बॅटिंगला आला. २१व्या ओव्हरमध्येच भारतानं ४१ रनच्या स्कोअरवर पहिल्या ४ विकेट गमावल्या. पण पुजारा खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्यानं शानदार शतक झळकावलं.
एकीकडून विकेट जात असल्यामुळे सुरुवातीला पुजारानं सावध खेळ केला. २४६ बॉलमध्ये १२३ रन करून पुजारा आऊट झाला. पुजारानं ३८० मिनीटं बॅटिंग केली. ४१ रनवर ४ विकेट गेल्यानंतर पुजारानं रोहितबरोबर ४५ रनची पार्टनरशीप केली. यानंतर पुजारानं ऋषभ पंतसोबत ४१ रन, अश्विनसोबत ६२ रन, ईशांत शर्मासोबत २१ रन आणि मोहम्मद शमीसोबत ४० रनची पार्टनरशीप केली.
पुजारानं त्याच्या खेळीमध्ये १८० बॉलवर एकही रन काढली नाही. तर ३० वेळा १ रन, २२ वेळा २ रन, ३ वेळा ३ रन, ७ फोर आणि २ सिक्स मारले. ५० च्या स्ट्राईक रेटनं पुजारानं त्याची खेळी केली. पॅट कमिन्सच्या शानदार थ्रोवर पुजारा रनआऊट झाला
Unreal. This is simply stunning from @patcummins30, especially after sending down 19 rapid overs on a blazing hot Adelaide day!#AUSvIND | @Toyota_Aus pic.twitter.com/APvK1GYBRd
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2018
चेतेश्वर पुजाराचं टेस्ट क्रिकेटमधलं हे १६वं शतक होतं. शतक करायच्या आधी पुजारानं टेस्ट क्रिकेटमध्ये ५ हजार रनही पूर्ण केले.