मुंबई : Glenn Maxwell Catch: गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचा 'सुपरमॅन' अवतार पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) गुरुवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात अचानक 'सुपरमॅन' झाला आणि त्याने हवेत झेपावत एक आश्चर्यकारक झेल पकडला. या कॅचची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
ग्लेन मॅक्सवेलची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. गुरुवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचा 'सुपरमॅन' अवतार पाहायला मिळाला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने गुजरात टायटन्सचा फॉर्मात असलेला फलंदाज शुभमन गिलचा जबरदस्त झेल घेतला.
गुजरात टायटन्सच्या डावाच्या तिसऱ्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) वेगवान गोलंदाज जोश गोलंदाजीसाठी आला. जोश हेझलवूडच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलचा चेंडू स्लिपमध्ये गेला आणि तिथे असलेला जागतिक क्रिकेटचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ग्लेन मॅक्सवेलने हवेत झेपावत झेल टिपला.
Again a great catch@Gmaxi_32 #Maxwell #GTvRCB #RCBvGT #RCBvsGT #GTvsRCB #GT #RCB #IPL2022 #IPL pic.twitter.com/K4xIbuOjHb
— Abhishek Vijay (Anchor@News18) (@Abhi_newsanchor) May 19, 2022
अवघ्या 1 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर शुबमन गिलला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. ग्लेन मॅक्सवेलचा हा झेल पाहिल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघातील त्याचा सहकारी विराट कोहलीही स्वत:ला रोखू शकला नाही. विराट कोहलीने लगेच ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
What a catch maxi and virat agrression #RCBvsGT #RCB pic.twitter.com/563DgQuvyL
— Rohit Kumar (@skipper_kohli) May 19, 2022