क्रिकेटर व्यंकटेश अय्यरचं ‘या’ अभिनेत्रीसोबत जुळलं सूत? फोटोवरील कमेंटने चर्चांना उधाण

कोलकत्ता नाइट रायडर्स संघातील धडाकेबाज ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यर नेहमीच आपल्या खेळीमुळे चर्चेत असतो. परंतू आता व्यंकटेश अय्यर आणि एक तेलुगू अभिनेत्रीचं सूत जुळलं असल्याची चर्चा सुरू आहे.

Updated: Apr 9, 2022, 03:03 PM IST
क्रिकेटर व्यंकटेश अय्यरचं ‘या’ अभिनेत्रीसोबत जुळलं सूत? फोटोवरील कमेंटने चर्चांना उधाण title=

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील नवोदित खेळाडू तसेच कोलकत्ता नाइट रायडर्स संघातील धडाकेबाज ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यर नेहमीच आपल्या खेळीमुळे चर्चेत असतो. परंतू आता व्यंकटेश अय्यर आणि एक तेलुगू अभिनेत्रीचं सूत जुळलं असल्याची चर्चा सुरू आहे. व्यंकटेशने इंस्टाग्रामवर एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टवर केलेली कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.

सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री प्रियांका जवळकरने तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यावर क्रिकेटर व्यंकटेश अय्यरने कमेंट केली. ही कमेंट इतकी प्रेमळ होती, की त्यावरून सोशलमीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली. त्याने प्रियांकाच्या एका पोस्टवर 'Cute' असं म्हटलं.

खरंतर अभिनेत्री प्रियंकाचा जन्म मराठी कुटूंबातच झाला. परंतू ती सध्या तेलुगू चित्रपटांमध्ये काम करते. प्रियांकाने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली असून उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला देखील गेली होती. व्यंकटेश अय्यरच्या कमेंटमुळे त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना सोशलमीडियावर उधान आलंय.