न्यूयॉर्क : यूएस ओपनच्या फायनलमध्ये डॉमिनिक थिईम आणि अॅलेक्सझांडर झिव्हरेव्ह एकमेकांशी भिडणार आहेत. सेमी फायनलमध्ये दोघांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये अॅलेक्सझांडर झिव्हरेव्हनं पाबेलो कर्नेओ बुस्टाचा ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ नं पराभव केला, तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये डॉमिनिक थिईमनं डॅनिअल मेदवेदवचा ६-३, ७-६, ७-६ अशा तीन सरळ सेट्समध्ये पराभवचा धक्का दिला आहे.
२०११ नंतर यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत दोन सेट गमावल्यानंतर झिव्हरेव्ह हा सामना जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी नोवाक जोकोविचने २०११ मध्ये रॉजर फेडरर विरुद्धचा सामना जिंकला होता. याव्यतिरिक्त, झिव्हरेव्ह नोव्हाक जोकोविचनंतर दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा खेळाडू आहे. जो मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करतो. जोकोविचने २०१० मध्ये न्यूयॉर्कमध्ये वयाच्या २३ व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती.