'माझं लक्ष्य तर...' बॅट्समनसाठी धोक्याची घंटा, उमरान मलिकचा खतरनाक इरादा

 फायर हू मै! 'या' बॉलरचा इरादा ऐकाल तर म्हणाल, बॅट्समनची दांडी गुल

Updated: Apr 28, 2022, 03:20 PM IST
'माझं लक्ष्य तर...' बॅट्समनसाठी धोक्याची घंटा, उमरान मलिकचा खतरनाक इरादा title=

मुंबई : आपल्या घातक बॉलिंगसाठी बुमराहनंतर कोणाचं नाव समोर येत असेल तर उमरान मलिक आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तर सर्वोत्तम फलंदाजी उमरान मलिकने केली आहे. बुमराहपेक्षाही घातक आणि वेगानं बॉल टाकून फलंदाजांची पळताभुई थोडी केली.

आयपीएलमध्ये हैदराबादला जिंकवून देण्यात उमरानचा मोठा वाटा आहे. गुजरात विरुद्धचा सामना हातून थोडक्यासाठी निसटला. पण उमराननं या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. आतापर्यंत 152 kmph वेगानं उमराननं बॉलिंग केली आहे. त्याची एकूण कामगिरी पाहता त्याला टीम इंडियातून खेळवण्यात यावं अशी मागणी वेगवेगळ्या स्तरावर होत आहे. 

उमरानचा ‘प्लेयर ऑफ द मॅच देऊन सन्मान करण्यात आला. त्याच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं. त्यानंतर उमरान मलिकने त्याचं पुढचं लक्ष्य सांगितलं. उमरान आपल्या कामगिरीवर समाधानी नाही. तर त्याचं स्वप्न आणखी वेगळं आहे. 

वेगवान गोलंदाजी करायची आणि लेन्थ राखून विकेट्स मिळवायची अशी योजना होती. मी हार्दिकची बाउन्सरने विकेट काढली आणि नंतर ऋद्धिमान साहाची यॉर्कर टाकून विकेट काढली. मी बॉलिंगमध्येही वैविध्य आणण्याचा प्रयत्न करतो. '

विकेट काढण्यावर मी लक्ष केंद्रीत केलं. 155 ताशी वेगानं बॉलिंग करण्याबाबत जेव्हा उमरानला विचार तेव्हा तो म्हणाला की देवाच्या मनात असेल तर तसं नक्की होईल. मात्र लक्ष्य विकेटवर असतं. 

उमराननं 8 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. युजवेंद्र चहलची पर्पल कॅप सध्या धोक्यात आहे. यंदाच्या हंगामात पाच विकेट घेणारा उमरान पहिला खेळाडू ठरला आहे. उमरानसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत. आता निवड समिती काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.