Umesh Yadav: विराट, राहूलनंतर आता उमेश यादव महाकालच्या दरबारी; म्हणाला...

Umesh Yadav At Mahakal Temple: उमेश यादव नंदीहाळात बसून शिवपूजेत तल्लीन झालेला दिसतोय. भस्म आरतीनंतर ते गर्भगृहात पोहोचले. जिथं त्यांनी बाबा महाकालला जल आणि दुधाचा अभिषेक केला.

Updated: Mar 20, 2023, 04:52 PM IST
Umesh Yadav: विराट, राहूलनंतर आता उमेश यादव महाकालच्या दरबारी; म्हणाला... title=
Umesh Yadav in Mahakal Temple Ujjain

Umesh YadavAt Mahakal Temple Ujjain: आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपपूर्वी (World Test Championship) टीम इंडियाची भक्ती वारी सुरू असल्याचं पहायला मिळतंय. मध्य प्रदेशातील उज्जैन (उज्जैन ) येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple) व्हीआयपी मंडळी भेट देत असतात. अशातच टीम इंडियाचा स्टार गोलंदाज महाकालच्या दरबारी पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरात भारतीय क्रिकेट संघाच्या सुमारे अर्धा डझन खेळाडूंनी बाबा महाकालचे (baba mahakal) दर्शन घेतले आहे.

टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) महाकालचे दर्शन घेतले होते. तर केएल राहूल (KL Rahul) देखील उज्जैनमध्ये दिसला होता. अशातच आता टीमचा स्टार गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) देखील महाकालेश्वर मंदिरात हजेरी लावली. उमेश यादव यांनी सकाळी १०:३० वाजता होणाऱ्या भस्म आरतीला (Bhasma Aarti) हजर होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Yaadav (@umeshyaadav)

उमेश यादव नंदीहाळात बसून शिवपूजेत तल्लीन झालेला दिसतोय. भस्म आरतीनंतर ते गर्भगृहात पोहोचले. जिथं त्यांनी बाबा महाकालला जल आणि दुधाचा अभिषेक केला. मंदिर समितीच्या नियमानुसार त्यांनी धोतर आणि शोला (Dhoti and Shola) परिधान केला होता. त्याच्या लूकची सध्या चर्चा होताना दिसत आहे.

काय म्हणाला Umesh Yadav ?

महाकालची आरती (Mahakal Aarti) केल्यानंतर त्याने माध्यमांशी (Press) संवाद साधला. देशात आणि जगात सुख-शांती नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी बाबा महाकालकडे केली आहे. पूजा करून उमेश यादव बाहेर आला तेव्हा चाहत्यांनी त्याला घेरले, त्यानंतर उमेशने त्याच्यासोबत सेल्फीही काढला.