नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान बॉलर उमेश यादव याने सर्वात जास्त ४ विकेट घेतल्या. मात्र तरीही काही लोकांनी त्याच्यावर सोशल मीडियात टिकेची झोड उठवली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एकूण ५ विकेट गेल्या, यातील ४ विकेट उमेश यादवने घेतल्या. पण तरीही क्रिकेट प्रेमी त्याच्यावर खुश नाहीयेत. चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने ३ बदल केले आहेत. यातील एक म्हणजे भुवनेश्वर कुमारच्या जागी उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. लोकांना भुवनेश्वरवर जास्त विश्वास होता. तो ऑस्ट्रेलियाची कंबर तोडणार असे त्यांना वाटत होते. पण तसे झाले नाही.
उमेश यादवने ४ विकेट घेतल्या असल्या तरी त्याने रन्सही खूप दिले आहेत. सुरूवातीच्या ५ ओव्हर्समध्ये त्याने ३७ रन्स दिले. त्यानंतर क्रिकेट प्रेमींनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला.
Umesh Yadav inconsistency is big problem for India. It will hurt badly in death overs. Can cost the game #INDvAUS
— ßєคɾɖ ßɷყ (@BeingFlicked) September 28, 2017
उमेश यादव की लाइन लेंथ और लड़कियों की डीपी कब चेंज हो जाए कोई बरोशा नहीं।#ViruPanti @StarSportsIndia @y_umesh
— himanshu rai (@him821rai) September 28, 2017
उमेश यादव और शमी इस तरह बोलिंग कर रहे हैं जैसे वे अभी तक टीम में न लिए जाने का बदला ले रहे हों।
— Shailesh Mishra (@Shailes42397237) September 28, 2017
#ViruPanti जेसे up में यादव परिवार पार्टी बदलता ह वेसे ही उमेश यादव लाइन और लेंथ बदलते ह
— Barjati Surender Cho (@BarjatiC) September 28, 2017
उमेश यादवची ब-याच कालावधीने टीममध्ये एन्ट्री झाली. उमेश यादवने या सामन्यात वनडे करिअरमध्ये १०० विकेट घेण्याचा कारनामा केलाय. सीरिज जिंकल्यानंतर विराटने भुवनेश्वर आणि बुमराहला विश्रांती दिली. त्यांच्या जागेवर उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना जागा देण्यात आलीये.