मालदीवमध्ये थांबलेले हे 2 ऑस्ट्रेलियन खेळाडू भिडले, माहिती पुढे आल्यानंतर दिलं स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश बंदी असल्याने सध्या क्रिकेटर मालदीवमध्ये थांबले आहेत.

Updated: May 9, 2021, 06:06 PM IST
मालदीवमध्ये थांबलेले हे 2 ऑस्ट्रेलियन खेळाडू भिडले, माहिती पुढे आल्यानंतर दिलं स्पष्टीकरण title=

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनाच्या संसग्रामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. त्यानंतर परदेशी खेळाडू आपल्य़ा घरी परतले आहे. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू अद्याप त्यांच्या घरी पोहोचू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियात प्रवेशा सध्या बंदी आहे. त्यामुळे परवानगी मिळेपर्यंत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवमध्ये थांबले आहेत. या दरम्यान, एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल स्लेटर यांच्यात भांडण!

मालदीवमध्ये असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू घरी पोहचण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भारत सोडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सर्व क्रिकेटपटू आणि इतर कर्मचारी मालदीवमधील ताज कोरल रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. पण या दरम्यान मालदीवच्या बारमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि टीकाकार मायकेल स्लेटर यांच्यात वाद झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये प्रथम वादविवाद झाला जो नंतर भांडणात बदलला. ही बातमी वेगाने पसरली, त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. आता या दोन्ही खेळाडूंनी मौन सोडलं आहे.

डेली टेलीग्राफने सर्वप्रथम मालदीवमधील ताज कोरल रिसॉर्टमध्ये वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात झालेल्या वादाची बातमी दिली. या आठवड्याच्या सुरूवातीस स्लेटर यांनी पंतप्रधानांच्या स्वत:च्या देशात ऑस्ट्रेलियन प्रवेशावर बंदी घातल्याने यावर पस्थित केला होता.

डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल स्लेटर हे त्या ऑस्ट्रेलियन लोकांपैकी आहेत. जे आयपीएल २०२१ चा भाग होते. या दोन्ही खेळाडूंनी बारमधील हा संघर्ष स्पष्टपणे नाकारला आहे. दोघेही म्हणतात की, ही गोष्ट खोटी आहे. ते बर्‍याच दिवसांपासून एकमेकांचे मित्र होते.

मायकेल स्लेटर म्हणाले, 'ही केवळ अफवा आहे. मी आणि वॉर्नर चांगले मित्र आहोत आणि असतील. आमच्यात कोणत्याही संघर्ष आणि भांडणाची शून्य शक्यता आहे '.

डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, "आमच्यात असे काहीही घडलेले नाही." मला माहित नाही की तुम्ही सर्व हे खूप लिहित आहात. तेसुद्धा जेव्हा तुम्ही स्वतः इथे हजर नसता. आपण काहीही पाहिले नाही आमच्यात काहीही झाले नाही'.