आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 10 बॅट्समन

आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकट आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 31, 2018, 11:07 AM IST
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 10 बॅट्समन title=

मुंबई : आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकट आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

यंदाच्या सीजनमध्ये कोण शतक ठोकतो याकडे देखील सर्वाचं लक्ष आहे. अनेक दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या टीममधून खेळणार आहे. पण सर्वच खेळाडू प्रत्येक सीजनमध्ये चांगली कामगिरी करतात असं होतं नाही. खूप कमी जणांना टी20 मध्ये शतक ठोकता येतं. आयपीएलमध्ये आतापर्यंत शतक करणारे टॉप 10 खेळाडू कोण आहेत. ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टॉप 10 खेळाडू

1. ख्रिस गेलने 101 सामन्यांमध्ये 5 शतकं केली आहेत.

2. विराट कोहलीने 149 सामन्यांमध्ये 4 शतकं केली आहेत.

3. डेविड वॉर्नरने 114 सामन्यांमध्ये 3 शतकं ठोकली आहेत.

4. एबी.डिवीलिअर्सने 129 सामन्यांमध्ये 3 शतकं ठोकली आहेत.

5. हाशिम आमलाने 16 सामन्यांमध्ये 3 शतकं ठोकली आहेत.

6. अॅडम गिलक्रिस्टने 80 सामन्यांमध्ये 2 शतकं ठोकली आहेत.

7. मुरली विजयने 100 सामन्यांमध्ये 2 शतकं ठोकली आहेत.

8. शेन वॉटसनने 102 सामन्यांमध्ये 2 शतकं ठोकली आहेत.

9. मॅक्यूलमने 103 सामन्यांमध्ये 2 शतकं ठोकली आहेत.

10. वीरेंद्र सेहवागने 104 सामन्यांमध्ये 2 शतकं ठोकली आहेत.