गोल्ड मेडल जिंकताच ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूनं फाडले स्वत:चे कपडे

कोण आहे हा खेळाडू ज्याने वर्ल्ड रेकॉर्ड मोडत सुवर्णपदक मिळवलं... या खेळाडूच्या बाबतीत काय घडलं ज्यामुळे त्याने मैदानात कपडे फाडले?

Updated: Aug 3, 2021, 11:01 PM IST
गोल्ड मेडल जिंकताच ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूनं फाडले स्वत:चे कपडे title=

टोकियो: ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होतं तेव्हा आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटतं. आपला आनंद गगनात मावेनासा होतो. शुक्रवारी नॉर्वेच्या एका खेळाडूनं सुवर्णपदक जिंकलं आणि त्याचा आनंद मैदानातच साजरा केला मात्र तो जरा अनोख्या प्रकारे केल्यानं त्याची चर्चा रंगली आहे. 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नॉर्वेच्या धावपटूनं कार्सटेन वारहोम याने 400 मीटर हर्डल पुरुष स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं. इतकंच नाही तर त्याने वर्ल्ड रेकॉर्डही तोडलं आहे. याचा आनंद साजरा करताना त्याने आपले कपडे मैदानात फाडले. हा सगळा प्रकार खूपच अजब होता. आनंद साजरा करताना धावपटूनं आपलेच कपडे मैदानात फाडले होते. 

कार्सटेन वारहोम याने 400 मीटर हर्डल स्पर्धेत  45.94 सेकेंदात पूर्ण केलं आहे. याआधी हा रेकॉर्ड 46.70 सेकंदात पूर्ण करण्यात आला होता. त्याचा रेकॉर्ड मोडत वारहोमने नवा रेकॉर्ड केला आणि सर्वांची मनं जिंकली. त्याचं जगभरात कौतुक होत आहे. मात्र त्याची जिंकल्यानंतरही जल्लोषाची पद्धत थोडी विचित्र असल्याने काहीजण त्याच्यावर टीका देखील करत आहेत. 

नॉर्वेच्या धावपटूनं आपला आनंद साजरा करत कपडे फाडले. आनंद साजरा करण्याची ही पद्धत ऑलिम्पिकच्या मैदानात विचित्र होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.