...जेव्हा टेनिसकोर्टवरच आली शारापोव्हाला लग्नाची मागणी!

रशियन ग्लॅमडॉल मारिया शारापोव्हाला एका चाहत्यानं टेनिस कोर्टवरच लग्नासाठी मागणी घातली... यावर तिनंही विचार करेन असं मिश्कीलपणे उत्तरही दिलं. 

Updated: Dec 1, 2017, 08:19 PM IST
...जेव्हा टेनिसकोर्टवरच आली शारापोव्हाला लग्नाची मागणी! title=

नवी दिल्ली : रशियन ग्लॅमडॉल मारिया शारापोव्हाला एका चाहत्यानं टेनिस कोर्टवरच लग्नासाठी मागणी घातली... यावर तिनंही विचार करेन असं मिश्कीलपणे उत्तरही दिलं. 

मारिया शारापोव्हा... टेनिसच्या दुनियेतील ग्लॅमरस चेहरा... पाच ग्रँडस्लॅम जिंकलेली ही रशियन ब्युटी... टेनिसकोर्टप्रमाणे टेनिसकोर्ट बाहेरही तिचा जलवा पाहिला मिळतो... एक ब्रँड म्हणूनही तिची ओळख आहे. त्याचप्रमाणे शारापोव्हानं आपल्या स्टायलिश लुकनं जगभरातील चाहत्यांवर आपली मोहिनी टाकलीय. 

शारापोव्हाचे जगभरात अनेक चाहते आहेत... तिच्या एका चाहत्यानं चक्क एका मॅच दरम्यान तिला लग्नाची मागणी घातली... आणि शारापोव्हानं या चाहत्याला 'मी विचार करेन' असं उत्तरही दिलं. इस्तांबूलमध्ये एका फ्रेंडली मॅच दरम्यान शारापोव्हाला लग्नासाठी ही मागणी घातली गेली होती... आणि तिनंही या चाहत्याला निराश केलं नाही. 

टेनिस कोर्टवर लग्नाची मागणी घालण्याची ही काहीच पहलीच वेळ नाही. याआधी स्टेफी ग्राफ या टेनिस सम्राज्ञीलाही एका चाहत्यानं अशी लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, त्यावेळी स्टेफीनं दिलेल्या उत्तर टेनिसकोर्टवर पाहण्यासाठी आलेले चाहते आश्चर्यचकीत झाले होते. 'स्टेफीनं या चाहत्याला तुझ्याकडे किती पैसे आहेत?' असा प्रतीप्रश्न केला होता. 

मारिया शारापोव्हा आणि स्टेफी ग्राफ आपल्या खेळासाठी जशा टेनिस विश्वात ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे ग्लॅमरस अंदाजासाठीही... आणि या टेनिसपटूंचे चाहतेही आपल्या टेनिसपटूंबाबतचं प्रेम अशा प्रकारे उत्स्फुर्तपणे व्यक्त करतात...