प्रत्येक चेंडू सीमारेषेपलीकडे धाडणाऱ्या क्रिकेटरची अचानक निवृत्ती, सगळेच हैराण

37 वर्षीय टेलरने खेळाडूने सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केली.

Updated: Dec 30, 2021, 11:26 AM IST
प्रत्येक चेंडू सीमारेषेपलीकडे धाडणाऱ्या क्रिकेटरची अचानक निवृत्ती, सगळेच हैराण title=

न्यूझीलंड : न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 37 वर्षीय टेलरने गुरुवारी सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केली. यावेळी रॉस टेलरने, यापुढच्या न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या दोन सिरीज खेळणार असल्याचं देखील सांगितलं आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर टेलरच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या या दोन सिरीज बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्ध असणार आहेत. बांग्लादेशविरूद्ध दोन टेस्टची सिरीज असून ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्याविरूद्ध वनडे खेळायच्या आहेत. 

रॉस टेलरने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "आज मी उन्हाळ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. बांग्लादेशविरुद्ध घरच्या मैदानात होणारी कसोटी मालिका त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्धची 6 वनडे मालिका शेवटची असेल. 17 वर्षांपासून मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. देशासाठी खेळणं ही अभिमानाची बाब आहे."

रॉस टेलरचं क्रिकेट करियर

टेलरने त्याच्या इंटरनॅशनल करियरमध्ये एकूण 445 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एकूण 40 शतकं जडली आहेत. त्याने एकूण 110 टेस्ट सामन्यात 7584 आणि 233 वनडे सामन्यांत 8581 धावा केल्या आहेत. 

त्याच्या नावावर 102 टी-20 सामन्यात 1909 धावा आहेत. रॉस टेलरने कसोटीत 19 आणि वनडे सामन्यात 21 शतकं झळकावली आहेत. त्याला अजून दोन कसोटी आणि 6 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.