मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वात चर्चीत आणि तितकेच दमदार नाव म्हणजे विराट कोहली. मैदानावरची त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहून अनेकजण अचंबीत होतात. विराटला हे कसे शक्य होते, असा त्यांचा भाबडा सवाल. पण, त्यासाठी तो मेहनतही तितकीच घेतो. फिटनेससाठी तो घेत असलेले डाएट ऐकून अनेकांना घम फुटेल.
आपले डाएट आणि फिटनेसच्या रहस्याबद्धल स्वत: विराटनेच माहिती सांगितली आहे. एक वेब सीरीज 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पीयन्स'मध्ये बोलताना विराटने आपल्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरबाबत माहिती दिली.
'विराट' ब्रेकफास्ट - तीन अंड्यांचे ऑम्लेट, एक संपूर्ण अंडे, सोबत पालक, काळी मिर्ची आणि पनीर या पदार्थांताच फज्जा उडवल्यावर कोहली ग्रिल्ड बेकन किंवा मासे खाणे पसंत करतो. विराटच्या ब्रेटफास्टमध्ये पपई, टरबूज आदिंचाही समावेश असतो. हे सर्व झाल्यावर एका लिंबू घातलेल्या ग्रिन टीसोबत विराटचा ब्रेकफास्ट संपतो.
कोहलीचा ब्रेकफास्ट जरी काहीसा विराट असला तरी, त्याचा लंच तितका तगडा नसतो. त्याच्या लंचमध्ये केवळ ग्रिल्ड चिकन, मसाला घालून उकडलेले बटाटे आणि भाज्या असतात. त्याच्या डॉक्टरांचा सल्ला असा की, डिनर नेहमीच हलके असायला हवे. त्यामुळे कोहलीचा भर शक्यतो सी फूड खाण्यावर असतो. त्याच्या डाएटमध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असते.