Hardik Pandya : हार्दिकच्या शॉर्टमुळे छोटी चाहती जखमी; सामन्यानंतर कर्णधाराने केलं असं की....!

Hardik Pandya : हार्दिकच्या एका शॉटमुळे लहान स्टेडियममधील लहान मुलगी जखमी झाली. यावेळी सामन्यानंतर हार्दिक ( Hardik Pandya ) ने केलेलं कृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.

सुरभि जगदीश | Updated: Aug 9, 2023, 06:35 PM IST
Hardik Pandya : हार्दिकच्या शॉर्टमुळे छोटी चाहती जखमी; सामन्यानंतर कर्णधाराने केलं असं की....! title=

Hardik Pandya : टीम इंडिया ( Team India ) सध्या वेस्ट इंडिज विरूद्ध टी-20 सिरीज खेळतेय. यावेळी दोन सामन्यांमध्ये पराभव स्विकारल्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात टी-20 चा कर्णधार हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) ने विनिंग सिक्स लगावत सामना भारताच्या पारड्यात पाडला. मात्र सामन्यापूर्वी हार्दिकच्या एका शॉटमुळे लहान स्टेडियममधील लहान मुलगी जखमी झाली. यावेळी सामन्यानंतर हार्दिक ( Hardik Pandya ) ने केलेलं कृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.

छोट्या चाहतीला भेटण्यासाठी पोहोचला हार्दिक

ही घटना तिसरा टी-20 सामना सुरु होण्यापूर्वी घडलेली आहे. सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) नेट्समध्ये प्रॅक्टिस करत होता. यावेळी त्याने खेळलेल्या एक शॉटमुळे लहान मुलीला जखम झाली. ही लहान मुलगी वेस्ट इंडिज विरूद्ध टीम इंडिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी आली होती. मात्र हार्दिक ( Hardik Pandya ) च्या एका शॉटमुळे ती जखमी झाली. 

दरम्यान या मुलीला झालेल्या दुखापतीनंतर हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) ही चिंतेत दिसला. मुलीला जखम झाल्याची माहिती मिळताच त्याने बीसीसीआय ( BCCI ) च्या वैद्यकीय पथकाला तिच्यावर उपचार करण्याची विनंती केली. यावेळी हार्दिकने त्या चाहतीला संपूर्ण सामना संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली. 

जखमी मुलीला दिलं खास गिफ्ट

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) ही जखमी चाहतीला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी हार्दिकने त्या चाहतीला खास गिफ्टंही दिलं. त्याने एका बॉलवर त्याचा ऑटोग्राफ करत तो बॉल त्या मुलीला गिफ्ट म्हणून दिला. 

हार्दिक पंड्या झाला ट्रोल

तिसऱ्या टी-20 सामन्यात विनिंग सिक्स मारत टीम इंडियाने कर्णधार हार्दिक पंड्याने सामना जिंकला. मात्र सामना जिंकवून दिल्यानंतरही हार्दिक पंड्याला ट्रोल करण्यात आलंय. भारताने सामना जिंकला तेव्हा 13 बॉल अद्यापही शिल्लक होते. यावेळी तिलक वर्माला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एका रनची गरज होती. मात्र 2 रन्सची गरज असताना हार्दिक पांड्या स्ट्राइकवर होता. यावेळी हार्दिक पांड्याने सिक्स लगावला आणि विजय मिळवून दिला. 

हार्दिकने सिक्स लगावल्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या तिलक ( Tilak Varma ) ला हाफ सेंच्युरी पूर्ण करता आली नाही. यामुळे सोशल मीडियावर हार्दिक पंड्याला चांगलच ट्रोल करण्यात आलं.