धक्कादायक! Team India मधील स्टार खेळाडूच्या रूममध्ये चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

Team India मधील स्टार खेळाडूच्या मौल्यवान वस्तूंवर चोरांचा डल्ला

Updated: Sep 27, 2022, 04:24 PM IST
धक्कादायक! Team India मधील स्टार खेळाडूच्या रूममध्ये चोरी, लाखोंचा ऐवज लंपास title=

Taniya Bhatia : भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्ध (IND W vs ENG W) चमकदार कामगिरी करत इंग्लंडला क्लिन स्वीप दिला. प्रथमच भारतीय महिला संघाने इंग्लंडचा त्यांच्याच जमिनीवर 3-0 ने पराभव केला. त्यामुळे भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. अशातच आता इंग्लंडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. टीम इंडियाच्या (Indian women cricketer) एका स्टार खेळाडूसोबत चोरीची घटना घडली. भारताची विकेटकिपर फलंदाज तानिया भाटियाने (Taniya Bhatia Sensational Claims) केलेल्या एका ट्विटमुळे बीसीसीआयचं (BCCI) टेन्शन वाढलं आहे. (team india wicketkeeper taniya bhatia sensational claims of stole during england tour)

तानिया भाटियाने सोमवारी ट्विट करत हॉटेलमध्ये चोरी झाल्याची माहिती दिली. लंडनमधील मैरियट हॉटेलमध्ये (Marriot Hotel London) महिला टीम प्रवास करत असताना कॅश, कार्ड आणि ज्वेलरी याच्यासह इतर सामान देखील चोरीला गेल्याची माहिती तानियाने दिली आहे. ट्विट करत तानियाने मौल्यवान वस्तूंवर डल्ला टाकल्याचं सांगितलं.

तानियाने ट्विटमध्ये काय म्हटलंय?

मैरियट हॉटेल लंडन मैडा वेलेमधील घटनेमुळे मला धक्का बसलाय आणि मी व्यवस्थापकांवर नाराज देखील आहे. भारतीय संघ ज्यावेळी सामन्यासाठी प्रवास करत होता, त्यावेळी कोणतरी माझ्या रुममध्ये प्रवेश केला आणि कॅश, कार्ड, घड्याळ आणि ज्वेलरी सोबतच माझी बॅग देखील चोरीला गेली आहे. झालेली ही घटना खूप असुरक्षित होती, असं ट्विट (Taniya Bhatia Tweet) तानियाने केलं आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (England and Wales Cricket Board) ऑफिशियल अकाऊंटला टॅग करत तानियाने आणखी एक ट्विट केलं. या प्रकरणात तात्काळ चौकशी आणि निकालाची अपेक्षा आहे, असं तानिया म्हणाली आहे. या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव दिसून आला आहे. ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. यापुढे अशी घटना होणार नाही याची दखल इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि त्यांचे सहकारी पार्टनर्स घेतील, असं देखील तानिया म्हणाली.

तानिया भाटिया ही चंदीगडची राहणारी आहे. भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंहचे वडिल आणि माजी भारतीय खेळाडू योगराज सिंह यांच्याकडून तानियाने प्रशिक्षण घेतलं आहे. तानिया भाटियाचे वडिल आणि काका देखील क्रिकेटर होते. 2018 साली तानियाने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर 2021 मध्ये तानियाने टेस्ट टीममध्ये स्थान मिळवलं होतं.

आणखी वाचा- 

IND vs SA : टीम इंडियाला मोठा धक्का, ऑलराउंडरसह 3 खेळाडू मालिकेतून बाहेर