अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर गब्बर शिखर धवनची पोस्ट, म्हणाला...

राष्ट्रपती भवनात आज (13 नोव्हेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते 12 खेळाडूंना खेलरत्न (Khelratna Award) तर 35 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) सन्मान करण्यात आला. 

Updated: Nov 13, 2021, 11:00 PM IST
अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर गब्बर शिखर धवनची पोस्ट, म्हणाला... title=

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात आज (13 नोव्हेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते 12 खेळाडूंना खेलरत्न (Khelratna Award) तर 35 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात शनिवारी संध्याकाळी शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) कामगिरीचा गौरव करण्यात आला. टीम इंडियाचा सलामवीर शिखर धवनला अर्जुन पुरस्कार देण्यात आला. अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर गब्बरने फेसबूकवर पोस्ट लिहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (team india star opener gabbar shikhar dhawan shared his emotion after recived arjuna award)

शिखर फेसबूक पोस्टध्ये काय म्हणाला? 

"मला अर्जुन पुरस्कार मिळाला, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.  मी त्या सर्वांचे आभार मानतो, जे माझ्या इथवरच्या प्रवासात माझ्यासोबत होते. माझे प्रशिक्षक, डॉक्टर,  सपोर्ट स्टाफ, बीसीसीआय, संघातील सहकारी, सर्व चाहते, माझे मित्र आणि कुटुंबियांचा उल्लेख शिखरने केला आहे. तुमची सोबत आणि प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं.  तुमच्या कठोर परिश्रमाची दखल घेतली जाणं, हा माझ्यासाठी अविश्विसनीय क्षण आहे.  मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.  देशाच्या नाव उज्वल करण्यासाठी मी कठोर मेहनत करेन. सर्व पुरस्कार विजेत्याचं अभिनंदन", अशा शब्दात शिखरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इतर खेळाडूंचाही गौरव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा कुस्तीपटू रवी दहिया, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन, अनुभवी गोलकीपर श्रीजेश पीआर, याशिवाय अवनी लेखरा, सुमित अंतील, प्रमोद भगत, मनीष नरवाल, मिताली राज आणि भारतीय हॉकी टीमचे कर्णधार सुनील क्षीरसागर यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.