T20 World Cup: सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तान 56 वर All Out! No Ball, Wide मुळे गाठलं अर्धशतक

T20 World Afghanistan Unwanted Record: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सेमी-फायनलचा समाना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या संघांदरम्यान खेळवण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 27, 2024, 08:09 AM IST
T20 World Cup: सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तान 56 वर All Out! No Ball, Wide मुळे गाठलं अर्धशतक title=
अफगाणिस्तानची निराशाजनक कामगिरी

T20 World Afghanistan Unwanted Record: टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी-फायनमध्ये दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या संघाची दाणादाण उडवल्याचं पाहायला मिळालं. ब्रायन लारा क्रिकेट अकदामी येथील मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकल्याचं सामन्याच्या पहिल्या ओव्हरपासूनच दिसून आलं. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांच्या माऱ्यापुढे अफगाणिस्तानचा संघ 12 ओव्हरही मैदानात तग धरु शकला नाही. अगदी पहिल्या ओव्हरपासूनच अफगाणिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लागला आणि संपूर्ण संघ 11.5 ओव्हरमध्ये अवघ्या 56 धावांवर तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकन संघाच्या गोलंदाजांचा दबदबा या पहिल्या डावात दिसून आला. अफगाणिस्तान संघाच्या नावावर टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी-फायनलमध्ये सर्वात कमी धावसंख्या करण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

अभूतपूर्व पडझड

मागील काही सामन्यांपासून प्रचंड फॉर्ममध्ये असलेल्या रेहमानुल्ला गुरबाझ भोपळाही न फोडता पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाद झाला. तिसऱ्या ओव्हरला गुलबदीन नबी बाद झाला. त्यानंतर चौथ्या ओव्हरला झारदान तंबूत परतला. दोन चेंडूंनंतर त्याच ओव्हरला मोहम्मद नबीही बाद झाला. पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अफगाणिस्तानची पाचवी विकेट पडली. यावेळेस 5 ओव्हरवर 23 धावांवर अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर सातव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ओमरात्झी बाद झाला.

दहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर जनत तंबूत परतला. त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर नूर अहमद बाद झाला. 10 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर संघाची धावसंख्या 50 वर असताना कर्णधार राशीद खानच्या रुपात अफगाणिस्तानची 9 वी विकेट पडली. 56 धावांवर नवीन-उल-हकच्या रुपात अफगाणिस्तानने 10 वी विकेट गमावली. अफगाणिस्तानच्या सुमार कामगिरीची कल्पना यावरुनच येईल की या 56 धावांपैकी 13 धावा अथिरिक्त होत्या. ओमरात्झी हा 10 धावांसहीत वैयक्तिक स्तरावर दुहेरी धावसंख्या गाठणारा अफगाणिस्तानचा एकमेव खेळाडू ठरला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची दमदार कामगिरी

दक्षिण आफ्रिकेच्या एकूण पाच गोलदाजांनी गोलंदाजी केली. त्यापैकीही केशव महाराजने केवळ एक ओव्हर टाकली. केशव महाराज वगळता इतर चारही गोलंदाजांनी प्रत्येकी किमान 2 तर जास्तीत जास्त 3 विकेट्स घेतल्या. मार्के जॅन्सनने 3 ओव्हरमध्ये 16 रन देत 3 गड्यांना बाद केलं. तबरीज शामझीनेही 3 विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा आणि एनरीज नॉर्टीज या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. अफणागिस्तानने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या दादा संघांना पराभूत केल्याने ते सेमी-फायनलमध्येही चमत्कार करतील अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांपुढे त्यांचा निभाव लागला नाही.