IND vs NED : नेदरलँड्स बाजी पलटवण्यात माहिर, रोहित शर्माला एक चूक पडू शकते महागात..

IND vs NED T20 World Cup:  नेदरलँड्सने सुपर-12 फेरी गाठण्यासाठी खूप घाम गाळला आहे. सुपर-12 फेरीतील पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव झाल्यानंतर पुढील दोन मॅच जिंकत नेदरलँडने जोरदार एण्ट्री घेतली आहे.  

Updated: Oct 27, 2022, 10:02 AM IST
IND vs NED : नेदरलँड्स बाजी पलटवण्यात माहिर, रोहित शर्माला एक चूक पडू शकते महागात.. title=
t20 world cup 2022 india vs netherlands live nmp

India vs Netherlands : T20 World Cup 2022 मध्ये आज भारताचा (India) सामना नेदरलँड्सशी (Netherlands) होणार आहे. सिडनीमध्ये ही मॅच दुपारी 12.30 खेळली जाणार आहे. T20 World Cup आपलं नाव कोरण्यासाठी भारतीय टीम सज्ज आहे. पण कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) ही चूक भारी पडू शकते. नेदरलँड्सला हलक्यात घेणे रोहित शर्माला महागात पडू शकतं. कारण नेदरलँड्स बाजी पलटवण्यात माहिर आहे. 

रोहित काय असेल रणनीती 

नेदरलँड्सने सुपर-12 फेरी गाठण्यासाठी खूप घाम गाळला आहे. सुपर-12 फेरीतील पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून (Bangladesh) पराभव झाल्यानंतर पुढील दोन मॅच जिंकत नेदरलँडने जोरदार एण्ट्री घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला नेदरलँड्सविरुद्ध रणनीती कशी बनवायची हे माहीत आहे पण तोही या संघाला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. (t20 world cup 2022 india vs netherlands live nmp)

'ही' मॅच लक्षात ठेवणं महत्त्वाचं 

तुम्हालाही ती मॅच आठवतं असेल 2009 च्या  T20 वर्ल्डमध्ये (T20 World Cup 2009) नेदरलँड्सने यजमान इंग्लंडचा (England) दारूण पराभव केला होता. त्यानंतर लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर नेदरलँड्सकडून पराभूत झाला होता. त्या सामन्यात इंग्लंडने 5 विकेट्सवर 162 धावा केल्या होत्या. यानंतर टॉम डी ग्रुथ (49) च्या जोरावर नेदरलँड्सने शेवटच्या चेंडूवर सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. त्यानंतर नेदरलँड्सचा कर्णधार जेरोन स्मिट्स सांभाळत होता. 

2014 च्या T20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा पराभव 

2014  मधील टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतही (T20 World Cup 2014 )नेदरलँड्सने इंग्लंडवर विजय मिळवला होता. त्याने चटवांगमध्ये खेळलेला सामना 45 धावांनी जिंकला. त्यामुळे नेदरलँड्सला हलक्यात घेणे टीम इंडियाला परवडणार नाही.