फिरकीच्या बादशाहचा बॅटिंगने धमाका, तुफान फटकेबाजी करत Rashid Khanने टीमला जिंकवलं

 राशिदने खानने (Rashid Khan) तुफानी खेळी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला.

Updated: Aug 25, 2021, 04:53 PM IST
फिरकीच्या बादशाहचा बॅटिंगने धमाका, तुफान फटकेबाजी करत Rashid Khanने टीमला जिंकवलं title=

लंडन : तालिबानने अफगाणिस्तानवर (Afganistan) कब्जा केल्याने लेग स्पिनर राशिद खान (Rashid Khan) अस्वस्थ आहे. अफगाणिस्तानात असलेल्या सद्यपरिस्थितीमुळे राशिद भावूक आहे. तसेच त्याने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. मात्र राशिदने याचा परिणाम आपल्या खेळावर अजिबात होऊ दिलेला नाही. राशिद जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा तो आपल्या फिरकीने प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडतो. मात्र यावेळेस राशिदने बॉलिंगसह बॅटिंगनेही धमाका केला. विशेष म्हणजे राशिदने तुफानी खेळीच्या जोरावर आपल्या टीमला विजय मिळवून दिला. राशिद सध्या इंग्लंडमधील विटालिटी ब्लास्ट  (Vitality Blast) या टी 20 स्पर्धेत ससेक्स (Sussex) टीमकडून खेळत आहे. या स्पर्धेत मंगळवारी तुफानी खेळी करत राशिदने आपल्या टीमला विजय मिळवून दिला. (T20 Blast 2021 Yorkshire vs Sussex Quarter Final 1 Sussex Rashid Khan hit 27 runs in 9 bowl) 

हा सामना रिवरसाईड ग्राऊंडवर खेळवण्यात आला. या सामन्यात यॉर्कशायरने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. यॉर्कशायरने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. त्यामुळे  ससेक्सला विजयासाठी 178 धावांचे आव्हान मिळाले. ससेक्सचा विजयाचा मार्ग जरा अवघड वाटत होता. ससेक्सची 16.3 ओव्हरमध्ये 135 धावांवर 4 विकेट अशी स्थिती झाली होती. यानंतर 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर डेव्हिड विसेही बाद झाला. त्यानंतर राशिदने तुफानी फटकेबाजीला सुरुवात केली.  
 
राशिदची अष्टपैलू कामगिरी

राशिदने अवघ्या 9 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 धमाकेदार सिक्सच्या मदतीने जोरदार नाबाद 27 धावा चोपल्या. महत्वाची बाब म्हणजे राशिदने हेलिकॉप्टर शॉटद्वारे सिक्स लगावला. राशिदने या धावा 300 च्या स्ट्राईक रेटने केल्या. या खेळीसह राशिदने आपल्या टीमला 2 चेंडूआधी  5 विकेट्सने शानदार विजय मिळवून दिला. राशिदने याआधी बॉलिंग करताना 4 ओव्हरमध्ये 25 धावा देत 1 विकेट घेतली. राशिदने केलेल्या या ऑलराऊंड कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.

दरम्यान त्याआधी यॉर्कशायरने पहिले बॅटिंग करताना 7 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. यॉर्कशायरकडून टॉम कॉहलर कॅडमोर आणि गॅरी बॅलन्स यो दोघांनी प्रत्येकी 55 धावांची खेळी केली. टॉमने 49 चेंडूत 3 फोर आणि 3 सिक्स ठोकले. गॅरीने वेगाने धावा केल्या. त्याने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्स लगावले. तर ससेक्सकडून टायमल मिल्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.