CWG 2018 : सुशीलची गोल्डन हॅटट्रिक, एका मिनिटात आफ्रिकेच्या कुस्तीपटूला केले चित

२१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी सुशील कुमारने ७४ किलो वजनी गटात दक्षिण आफ्रिकेच्या कुस्तीपटूला हरवत देशाला कुस्तीमधील चौथे गोल्ड मेडल मिळवून दिले. 

Updated: Apr 12, 2018, 03:23 PM IST
CWG 2018 : सुशीलची गोल्डन हॅटट्रिक, एका मिनिटात आफ्रिकेच्या कुस्तीपटूला केले चित title=

गोल्ड कोस्ट : २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी सुशील कुमारने ७४ किलो वजनी गटात दक्षिण आफ्रिकेच्या कुस्तीपटूला हरवत देशाला कुस्तीमधील चौथे गोल्ड मेडल मिळवून दिले. भारताचा दिग्गज कुस्तीपटूने केवळ एका मिनिटात आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चित केले. यासोबतच भारताच्या खात्यात १४व्या सुवर्णपदकाची भर पडली. 

सुशीलने ७४ किलो वजनी गटात आफ्रिकेच्या जोहानेस बोथाला १०- अशी मात दिली. सुशीलने २०१० दिल्ली आणि २०१४ येथील ग्लासगोमध्ये आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. या विजयासह पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. सुशील कुमारने दोन ऑलिंपिक पदकेही जिंकली होती. 

सुशीलने बोथाला पहिल्याच मिनिटात पूर्णपणे लोळवत चार गुण मिळवले. त्यानंतर त्याला खाली आपटत आणखी २ गुण मिळवले. सुशीलने बोथाला सावरण्याची संधीच दिली नाही आणि आणखी ४ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले.

याआधी सेमीफायनलमध्ये सुशीलने ऑस्ट्रेलियाच्या कोनोर इव्हांसला ४-० अशी मात देत फायनलमध्ये प्रवेश केला. सुशीलने क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद बटला ४-० अशी मात दिली.