Suryakumar Yadav : ‘MR 360’ म्हणणारा टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ने त्याच्या उत्तम खेळीने छाप पाडली आहे. त्याने त्याच्या बॅटींग स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. गेले काही दिवस तो उत्तम क्रिकेट खेळताना दिसतोय. मात्र बांगलादेश विरूद्धच्या (IND vs BAN) वनडे सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला टीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सध्या टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे आणि शेवटचा सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.
न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला बांगलादेशाचा दौरा करायचा आहे. यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज आणि 2 सामन्यांची टेस्ट सिरीज भारताला खेळायची आहे. मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला या सिरीजच्या बाहेर ठेवण्यात आलंय. जाणून घेऊया सूर्याला या सिरीजमध्ये का निवडलं नाही.
न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे सिरीजनंतर काही खेळाडू बांगलादेशासाठी रवाना होणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत अनुभवी खेळाडूंचं कमबॅक होणार आहे. मात्र या सिरीजमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला बाहेर ठेवण्यात आलंय.
मीडिया रिपोर्टनुसार, सूर्यकुमार गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट खेळतोय. तो एशिया कप आणि टी-20 वर्ल्डकपचा देखील हिस्सा होता. अशातच बोर्डाने आता त्याला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर टीम इंडिया बांगलादेशाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 दिसंबर रोजी होणार आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सिरीज खेळायची आहे.
वनडे टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकुर , मो. शमी, मो. सिराज, दीपक चाहर, यश दयाल
टेस्ट टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव