सूर्यकुमारच्या पत्नीला दुसऱ्याच खेळाडूकडून मिळालं गिफ्ट; पाहा काय होतं ते...

62 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

Updated: Nov 18, 2021, 10:17 AM IST
सूर्यकुमारच्या पत्नीला दुसऱ्याच खेळाडूकडून मिळालं गिफ्ट; पाहा काय होतं ते... title=

जयपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला T-20 सामना जिंकला आणि या विजयाचा हिरो ठरला फलंदाज तो म्हणजे सूर्यकुमार यादव. केएल राहुलची विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने उत्तम खेळी करत अर्धशतक पूर्ण केलं. 62 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

भारताच्या डावामध्ये 16व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवचा एक कॅचही सुटला. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने फाइन लेगवर सूर्यकुमार यादवचा झेल सोडला आणि तो चौकार गेला. दरम्यान यानंतर सूर्यकुमार यादवनेही ट्रेंट बोल्टचे आभार मानले. तो म्हणाला की, आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे, त्यामुळे कॅच सोडल्याबद्दल धन्यवाद.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. कालच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 40 चेंडूंमध्ये 62 रन्स केले. यावेळी त्याने 6 चौकार आणि 3 षटकारही जोडले. कर्णधार रोहित शर्माच्या साथीने त्याने डाव सांभाळत चांगला खेळ केला.

मॅचविनर सूर्यकुमार यादव

सामना संपल्यानंतर यादवच्या कामगिरीबद्दल कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, सूर्यकुमार आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो एक चांगल्या स्पिनने खेळतो. 

तर सूर्यकुमार यादव म्हणाला, मी विजयाने खूश आहे. पहिला विजय नेहमीच चांगला असतो. मी नेटमध्ये त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर सामन्यादरम्यान त्याची पुनरावृत्ती करतो.

भारताची न्यूझीलंडवर मात

भारताने पहिल्या T-20 सामन्यात न्यूझीलंडवर पाच विकेट्सनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने भारताला 165 धावांचे लक्ष्य दिलं होतं. याचा पाठलाग करताना भारताने 2 चेंडू बाकी असताना 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठलंय.