IND vs PAK : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापुर्वी 'या' खेळाडूने घेतला संन्यास

क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का, भारत-पाक फायनल सामन्यापुर्वी खेळाडूने घेतली निवृत्ती 

Updated: Nov 7, 2022, 10:04 PM IST
IND vs PAK : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापुर्वी 'या' खेळाडूने घेतला संन्यास title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमधील (T20 world cup) सुपर 12 चे सामने पार पडले आहेत. आता सेमी फायनलची लढत होणार आहे. या लढतीनंतर फायनलचा महामुकाबला पार पडणार आहे. या महामुकाबल्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महामुकाबल्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता असताना एका स्टार खेळाडूने निवृत्तीची (retirement) घोषणा केली आहे. या खेळाडूने घेतलेली निवृत्ती पाहून क्रिकेट फॅन्सना धक्का बसला आहे.  

हे ही वाचा : IND vs PAK फायनलची वाट पाहतोय 'हा' दिग्गज क्रिक्रेटर 

कोण आहे खेळाडू?

भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) महामुकाबल्याआधी नेदरलँडचा (netherland) स्टार खेळाडू स्टीफन मायबर्गने  (stephan myburgh) अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. मायबर्गने (stephan myburgh retirement) इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 38 वर्षीय स्टीफनच्या या घोषणेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

हे ही वाचा :  क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध खेळाडूवर निलंबनाची कारवाई 

निवृत्तीच्या पोस्टमध्ये काय म्हणाला? 

स्टीफन मायबर्ग (stephan myburgh retirement) आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, 'शूज लटकवण्याची वेळ आली आहे, 17 हंगामांपूर्वी प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करणे आणि 12 हंगामांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणे हा माझ्यासाठी एक संस्मरणीय क्षण होता, असे त्याने म्हटले आहे. 

स्टीफन मायबर्ग (stephan myburgh) पुढे म्हणतो की, वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर माझी कारकीर्द संपुष्टात येईल, असे मला कधीच वाटले नव्हते. माझ्या देशासाठी खेळताना प्रत्येक खेळाडूप्रमाणे माझ्याही डोळ्यात अश्रू आले, मला नेदरलँड क्रिकेटचे आभार मानायचे आहे, असे शेवटी तो म्हणतोय. 

हे ही वाचा : सृष्टी तावडेच्या रॅपने सर्वसामान्य महिलांना मिळालं बळ, जाणून घ्या

कारकिर्द 

स्टीफन मायबर्गने (stephan myburgh) 22 एकदिवसीय सामने, 45 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावे अनुक्रमे 527, 915 धावा होत्या. स्टीफन मायबर्गने 2011 मध्ये एकदिवसीय आणि 2012 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले होते. 

नेदरलँडसची वर्ल्ड कप कामगिरी

टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 world cup) नेदरलँडची (netherland) कामगिरी खुपच चांगली होती. शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिके साऱख्या बलाढ्य संघाचा त्यांनी पराभव केला. या पराभवासह त्याने दक्षिण आफ्रिकेला बाहेरचा रस्ता दाखवला. या विजयाचा नेदरलँड काही फायदा झाला नसला तरी पाकिस्तानला (Pakistan) मात्र झाला आहे. नेदरलँडच्या विजयामुळे पाकिस्तानचं सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म झालं होत. नेदरलँड्सने वर्ल्ड कपमध्ये 5 सामने खेळले, त्यात 2 विजय आणि 3 पराभवांचा समावेश आहे. नेदरलँड चार गुणांसह त्यांच्या गटात चौथ्या स्थानावर आहे.

दरम्यान आता T20 वर्ल्ड कप (T20 world cup) स्पर्धेतील नेदरलँडचा (netherland) प्रवास आता संपुष्ठात आला आहे, त्यानंतर आता स्टार क्रिकेटर स्टीफन मायबर्गने (stephan myburgh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूपासून निवृत्तीची घोषणा केली आहे.