मुंबई : क्रिकेट सामन्या दरम्यान अपघात होण्याच्या घटना काही नवीन नाही. मात्र ही घटना भीषणचं घडली. क्रिकेट सामन्याची तयारी सुरु असतानाचा वादळी पाऊस आला आणि स्टेडियममध्ये बांधलेले प्रेक्षक स्टँडचं छतचं कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्वरीत मैदानात अॅम्ब्युलन्स बोलवावी गेली होती. अद्याप तरी या घटनेत किती जीवीतहानी झाली आहे याची माहिती समोर आली नाहीये.
Situation now at Galle #SLvsAUS pic.twitter.com/4NBbulUEQn
— Anjana Kaluarachchi (@Anjana_CT) June 30, 2022
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात गॉलमध्ये कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा पहिला दिवस यशस्वीरीत्य़ा पार पडला. पहिल्या दिवशी श्रीलंकेने पहिल्या डावात 212 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार होता. मात्र त्यापुर्वीच भीषण घटना घडलीय.
कसोटी सामन्य़ाच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळासाठी ऑस्ट्रेलिया संघ मैदानात पोहोचला होता. प्रेक्षकांनी सुद्धा या सामन्यासाठी स्टेडियममध्ये मोठी गर्दी केली होती. सकाळपासून या सामन्यावर पावसाचे सावट होते. दरम्यान सामना सुरु होण्यापुर्वी मैदानात अचानक तुफान वादळ आलं आणि जोराचा पाऊस सुरु झाला. या वादळात स्टेडियममध्य़े तात्पुरत्य़ा स्वरूपात बांधण्यात आलेल्या स्टेडियमचे छत कोसळले. या तात्पुरत्य़ा बनवलेल्या प्रेक्षक बसल्याची माहिती आहे.त्यामुळे हे छत पडून अनेक प्रेक्षक जखमी झाल्याची माहिती आहे.
दरम्यान या घटनेनंतर मैदानात अॅम्ब्युलन्सला मैदानात पाचारण करण्यात आले होते. या घटनेत किती जणांना दुखापत झाली आहे याची माहिती समोर आली नाही आहे. तसेच सुदैवाने या घटनेत ऑस्ट्रेलियन खेळाडू बचावले आहेत.
स्टेडियमची दुरावस्था
गॉल स्टेडियममध्ये आलेल्या वादळी पावसामुळे स्टेडियमची दुरावस्था झालीय. तात्पुरती बनवलेली प्रेक्षक गॅलरी कोसळली आहे. त्याचे संपुर्ण छत तुटले आहे. तर मैदानात पाणी पाणीच भरले आहे. यामुळे आजचा सामना होण्याची शक्यता कमी आहे.
श्रीलंकेचा पहिला डाव
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने पहिल्या डावात 212 धावा केल्या. यष्टिरक्षक निरोशन डिकवेलाने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत ५८ धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजने 39 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऑफस्पिनर नॅथन लायनने 90 धावांत 5 बळी घेतले. मिचेल स्वेपसननेही ३ बळी घेतले. स्टार्क आणि कमिन्स यांना 1-1 विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ ६ धावांवर धावबाद झाला. लॅबुशेनही १३ धावा करू शकला. वॉर्नरचा डाव २५ धावांवर संपला आहे.