Sri Lankan supporter Percy Abeysekera : ऊन असो वा पाऊस.. आर्थिक संकट असो किंवा कोणतीही आपत्ती... श्रीलंकेचा सामना असेल तेव्हा मैदानात हजर असायचे ते पर्सी अंकल. होय... श्रीलंकन क्रिकेट संघाचा (Sri Lanka Cricket Team) चाहता पर्सी अबेसेकेरा यांनी गेली 41 वर्ष श्रीलंकेला सपोर्ट केला आहे. आता याच प्रसिद्ध पर्सी अंकल (Percy Abeysekera passes away) यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. पर्सी अबेसेकेरा यांचं सोमवारी दीर्घ आजाराने कोलंबो येथे निधन झालं. 1979 च्या विश्वचषकापासून लंकेच्या क्रिकेट संघाला पाठिंबा देत प्रवास सुरू केला होता, आता अखेर त्यांनी मैदान सोडलं आहे. त्यांच्या जाण्याने श्रीलंकेत शोक व्यक्त केला जातोय. तर बीसीसीआयने (BCCI) देखील पोस्ट करत पर्सी अंकल यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलंय.
पर्सी अंकल (Percy Uncle) हे क्रिकेट इतिहासामधील असे एकमेव फॅन होते, ज्यांना प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. एकदा अंकल पर्सी आपल्या पारंपरिक पद्धतीने श्रीलंकेचा ध्वज घेऊन स्टेडियमवर पोहोचले होते. त्याने सामना पाहिला आणि संघाला सपोर्टही केला. हा सामना श्रीलंका आणि न्यूझीलंड (SL vs NZ) यांच्यात खेळला गेला होता. न्यूझीलंड संघाचा कर्णधार मार्टिन क्रो याने या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा (Player of the Match) पुरस्कार देण्यात आला होता. मात्र, मार्टिन क्रो याने मोठं मन दाखवलं अन् थेट श्रीलंकेचं ड्रेसिंग रुम गाठलं.
मार्टिन क्रो याने श्रीलंकेच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन र्सी अंकलला सामनावीराचा किताब दिला होता. त्यावेळी पर्सी अंकलची चर्चा मात्र खूप झाली. तुम्हाला माहित असेल तर, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पर्सी अंकललाही सर्व सामन्यांमध्ये देशाचा झेंडा घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. तर अंकल पर्सी यांनाही संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाण्याची परवानगी होती. एवढंच नाही तर, श्रीलंका क्रिकेटने पर्सी अंकलला आपल्या बोर्डात सामील होण्याची ऑफर देखील दिली होती. मात्र, त्यांनी थेट नकार दिला होता.
पर्सी अबेसेकेरा हे उर्जेस्थान होते त्याच्या सततच्या जयजयकाराने मैदानावरील प्रत्येक क्षण उजळून निघाला होता. त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंशी घनिष्ट संबंध सामायिक केलं होते आणि प्रत्येकवेळी टीम इंडियाने श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा त्यांनी मजबूत संबंध विकसित केला. त्याची उपस्थिती खूप कमी होईल. आमचे विचार त्यांच्या कुटुंबीयांसह आणि प्रियजनांसोबत आहेत, असं बीसीसीआयने (BCCI Post For Percy Abeysekera) पोस्ट करत म्हटलं आहे.
Percy Abeysekera was a bundle of energy, lighting up every moment on the field with his constant cheering. He shared a deep bond with Indian cricketers and developed a strong connect every time Team India toured Sri Lanka. His presence will be dearly missed. Our thoughts are with… https://t.co/6Yt9Y9Lz3D
— BCCI (@BCCI) October 30, 2023
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून अबेसेकेरा यांची प्रकृती ढासळत चालली होती. अलीकडेच श्रीलंका क्रिकेटने त्याला त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी 5 दशलक्ष लंकन रुपये दिले होते. पर्सी अंकलची आपुलकी एवढी होती की, त्यांनी सर्व खेळाडूंचं मन जिंकून घेतलं होतं. नुकत्याच झालेल्या आशिया चषकादरम्यान रोहितने अबेसेकेराला कोलंबो येथील त्याच्या घरी भेट दिली होती. तर श्रीलंकेचा प्रत्येक क्रिकेटर त्यांची घरी जात असे. मात्र, आता सर्वांच्या लाडक्या पर्सी अंकल यांनी सर्वांना झटकाच दिला आहे.