देशात कोणीच सुरक्षित नाही; गांगुलीच्या मुलीची लक्षवेधी पोस्ट

तिची पोस्ट व्हायरल होताच सौरव गांगुलीने पुढाकार घेत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. 

Updated: Dec 19, 2019, 06:23 PM IST
देशात कोणीच सुरक्षित नाही; गांगुलीच्या मुलीची लक्षवेधी पोस्ट  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : CAA म्हणजेच नागरिकता सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन देसात गेले कित्येक दिवस अशांततेचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी होणारी आंदोलनं, सर्वसामान्यांचा या कायद्याला असणारा विरोध, कुणीकडून मिळणारं समर्थन, विरोधात होणारी घोषणाबाजी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नांत एकदा जमावबंदीचे आदेश देणारं तर, एकदा पोलीस यंत्रणा तैनात करणारं सरकार. अशीच परिस्थिती देसभरात पाहायला मिळत आहे. याचविषयी एक पोस्ट करत माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरव गांगुली याच्या मुलीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. 

सनाच्या एका पोस्टविषयीच्या वाढत्या चर्चा आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता अखेर सौरवनेच ट्विट करत ती लहान असल्याची बाब अधोरेखित केली. सोबतच या साऱ्यापासून तिला दूर राहण्यास सांगितलं. कुशवंत सिंग यांच्या २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातील एक परिच्छेद तिने पोस्ट केला. 

भीतीच्या बळावर उभी असणारी एखादी मोहिम ही सातत्यपूर्ण भीतीदायक वातावरणाच्याच बळावर आणि गोंधळाच्या वातावरणावर तग धरु शकेल. आपल्यापैकी ज्यांना सुरक्षित असल्याची जाणीव होत आहे ते म्हणजे मुर्खांच्या दुनियेत राहणारे आपण एकतर मुस्लिम किंवा ख्रिस्तधर्मीय नाही. 

अतिशय थेट अशा या परिच्छेदात संघाच्या विचारसरणीवरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 'संघाने आधीच डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांना आणि पाश्चिमात्य विचारांची कास धरणाऱ्या तरुणाईला निशाण्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. उद्या त्यांची ही घृणेची भावना स्कर्ट घालणाऱ्या महिला, मांस खाणारी, मद्यपान करणारी, औचित्य साधून मंदिरात न जाणारी, पाश्चिमात्य चित्रपट पाहणारी, दंत मंजनऐवजी टूथपेस्ट वापरणारी, वैद्यांऐवजी ऍलोपेथिक डॉक्टरकडे जाणारी आणि जय श्री राम ऐवजी किस करणारी किंवा शेक हँड (हस्तांदोलन) करणारी जनता यांच्यावरही निशाणा साधेल. या देशात कोणीच सुरक्षित नाही. मुळात भारत जिवंत असल्याची भावना आपल्या मनात असेल तर, ही गोष्ट आपण लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे', असं सनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. 

virat

सनाची ही पोस्ट इतकी व्हायरल झाली, की त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली. हे सर्व प्रकरण वेगळ्या वळणावर जात असल्याचं लक्षात येताच ही पोस्ट तिची नसल्याची बाब सौरव गांगुलीने स्पष्ट केली. राजकारणाचील पेच समजून घेण्यासाठी तिचं वय फारच कमी असल्याचं त्याने ट्विट करत म्हटलं.