ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना घरी पाठवण्यासाठी सोनू सूद तयार, शेअर केला मजेशीर मेसेज

सोनू सूदने नुकतंच सुरेश रैनाच्या एका मेसेजवरून ऑक्सिजन पोहोचवण्याची व्यवस्था केली होती.

Updated: May 8, 2021, 01:18 PM IST
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना घरी पाठवण्यासाठी सोनू सूद तयार, शेअर केला मजेशीर मेसेज title=

मुंबई: देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. कुठे ऑक्सिजन तर कुठे महत्त्वाचे इंजेक्शन तर कुठे अपुऱ्या सुविधा यामुळे जवळची माणस कोरोना हिरावून नेत आहेत. अशा परिस्थितीत अनेक संस्था, खेळाडू, उद्योजक, कलाकार आपल्या आपल्या परिनं सर्वसामन्य आणि गरजू रुग्ण-नागरिकांना मदतीसाठी हात पुढे करत आहेत. प्रत्येक दिवशी जवळपास 3 लाखहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहे. बायो बबलमध्ये कोरोना शिरल्यामुळे IPL 2021 देखील तात्पुरतं स्थगित करावं लागलं.

दुसरीकडे IPL स्थगित झाल्याने सगळे खेळाडू आपल्या घरी गेले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मात्र भारतातून थेट ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे ते खेळाडू मालदीववरून ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर काही मजेशीर मीम्स व्हायरल झाले आहेत. 

एका युझरने मजेशीर मीम शेअर केलं आहे. या फोटोमध्ये पाहू शकता की मजेशीर कार्टुन आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू घरी जाण्यासाठी आतूर आहेत. त्यावर सोनू सूदने रिप्लाय करत आता लगेच बॅक भरा असं म्हणत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. 

बॉलिवूडचा सुपरस्टार सोनू सूद मागच्या वर्षापासून देवदूत बनला आहे. गरजू लोकांना अन्न-पुरवठा असो किंवा ऑक्सिजनची मदत असो सोनू सूद जेवढं शक्य आहे त्यापरिनं त्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न कायमच करत असतो. 

सुरेश रैनालाही केली मदत

ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांची जीव गेल्याचं डोळ्यासमोर भीषण वास्तव असताना सुरेश रैनाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला ऑक्सिजनची खूप गरज होती. त्याने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिल्यानंतर सोनू सूदने 10 मिनिटांत त्या व्यक्तीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी मदत केली आहे.