T20 World Cup: 'जो जीता वही 'सिकंदर''! स्टार खेळाडूकडून Virat Kohli चा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

आधी पाकिस्तानला हरवलं, आता विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, झिंबाब्वेची टी 20 वर्ल्ड कपमध्ये दहशत

Updated: Oct 29, 2022, 08:02 PM IST
T20 World Cup: 'जो जीता वही 'सिकंदर''! स्टार खेळाडूकडून Virat Kohli चा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक title=

पर्थ : क्रिकेट वर्तुळात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिंबाब्वेने (Zimbabwe) टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला. या पराभवानंतर टी20 वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वेची एकच चर्चा रंगली आहे. त्यात आता पाकिस्तानला (Pakistan) पराभवाचं पाणी पाजल्यांनतर याच झिंबाब्वेच्या एका खेळाडूने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) वर्ल्ड रेकॉर्ड देखील मोडला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये एकाचा पराभव केला तर एका संघाच्या दिग्गज खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, हे पाहून झिंबाब्वेची टी20 वर्ल्ड कपमध्ये दहशत वाढत असल्याची चर्चा आहे. 

झिम्बाब्वेने (Zimbabwe) बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला. टी20 वर्ल्ड कपमधला हा सर्वात मोठा उलटफेर होता. झिम्बाब्वेकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती. आता तर उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान संघाला दुसऱ्या संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा प्रवास कठीण असणार आहे.  

झिंबाब्वेच्या खेळाडूची कमाल 

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात झिंबाब्वेचा (Zimbabwe) दिग्गज सिकंदर रझा बटने (Sikandar Raza Butt) फक्त 9 चं धावा केल्या होत्या. मात्र त्याने गोलंदाजीत कमाल दाखवली. सिकंदर रझाने सामन्यात 3 महत्वपुर्ण विकेटस घेतल्या होत्या. त्याने शान मसूद, शादाब खान आणि हैदर अली या तिघांची विकेट घेऊन सामनाच पालटला होता. रझाने 4 ओव्हरमध्ये 25 धावा देत 3 विकेट घेतले होते. या त्याच्या कामगिरीवरून त्याला प्लेयर ऑफ द मॅच किताब देण्यात आला होता. हा किताब जिंकत त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 

विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला

सिकंदर रझाने (Sikandar Raza Butt) पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकत एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हा किताब जिंकत एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकणारा तो खेळाडू बनला आहे. हा रेकॉर्ड करत त्याने विराट कोहलीचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. 

किती पुरस्कार जिंकलेत?

रझा (Sikandar Raza Butt) 2022 मध्ये एकूण 7 वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. त्याच वेळी, कोहलीने 2016 मध्ये 6 वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकण्यात यश मिळविले होते. याशिवाय युगांडाच्या दिनेश नाक्राणीने 2021 मध्ये 6 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावण्यात यश मिळविले आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्येही सिकंदरचीच हवा 

दरम्यान ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) बद्दल बोलायचं झालं तर सिकंदर रझा सर्वाधिक खेळाडूंचा पुरस्कार जिंकण्यातही आघाडीवर आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याने तीनदा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावला आहे. त्याचवेळी, विराट कोहलीला 2016 टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोनदा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला होता.

दरम्यान झिंबाब्वेचा दिग्गज सिकंदर रझा (Sikandar Raza Butt) सध्या खुप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आता झिंबाब्वे टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) कुठपर्यंत मजल मारते हे पाहावे लागणार आहे.