त्रिनिदाद : भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. तिसऱ्या वनडेत टीम इंडियाने 119 रन्सने विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलने झंझावाती खेळी खेळताना 98 रन्स केले. मात्र आणि त्याचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक अवघ्या 2 रन्सने हुकलं. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित सर्व चाहत्यांना धक्का बसला. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर शुभमन गिलने एक अतिशय भावनिक वक्तव्य केलंय.
शुभमन गिलने तिसऱ्या वनडे सामन्यात 98 बॉल्समध्ये 98 रन्स केले, ज्यामध्ये 7 चौकार आणि 2 सिक्स मारले. जेव्हा गिल 98 धावांवर खेळत होता त्यावेळी पाऊस आला आणि खेळ मध्येच थांबवावा लागला. त्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा भारताला फलंदाजीची संधी मिळाली नाही. कारणामुळे गिलचे शतक अवघ्या दोन रन्सने हुकलं.
शतक हुकल्यानंतर शुभमन गिलने अतिशय भावनिक वक्तव्य केलं आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'मला शतक झळकावण्याची आशा होती, पण पाऊस माझ्या नियंत्रणात नव्हता. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये मी ज्या प्रकारे बाद झालो त्यामुळे मी खूप निराश झालो."
तो पुढे म्हणाला, मी बॉलप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला आणि दबाव योग्य प्रकारे हाताळला. मला फक्त आणखी एक ओव्हर हवी होती, त्याची अपेक्षा होती. तिन्ही सामन्यांमध्ये विकेटने जबरदस्त खेळ दाखवला. 30 ओव्हरनंतर बॉल थोडासा पकड घेत होता."
शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध चांगला खेळ केला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 64 रन्स केले, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 43 रन्स केले. त्याचवेळी गिलने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 98 रन्सचं योगदान दिलं. गिलच्या दमदार कामगिरीमुळे त्याला 'मॅन ऑफ सिरीज' पुरस्कार देण्यात आला.