Shubman Gill Video: कंट्रोल गिल कंट्रोल! फिल्डींग करताना शुभमनने कोणाला केली शिवीगाळ?

Shubman Gill Video: ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना शुभमन गिलने (Shubman Gill) आज दोन सोप्पे कॅच सोडून दिले. हे कॅच सोडल्यामुळे शुभमनला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं. दरम्यान यावेळी शुभमन स्वतःवरही संतापलेला दिसला. 

Updated: Mar 17, 2023, 11:03 PM IST
Shubman Gill Video: कंट्रोल गिल कंट्रोल! फिल्डींग करताना शुभमनने कोणाला केली शिवीगाळ?  title=

Shubman Gill Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs aus) यांच्यामध्ये आज पहिला वनडे सामना (IND vs AUS 1st ODI) खेळवण्यात आला. वनडे सिरीजची सुरुवात टीम इंडियाने (Team India) पहिल्या विजयाने केली आहे. या विजयाचा खरा शिल्पकार केएल राहुल (KL Rahul) ठरला. राहुलच्या शानदार अर्धशतकामुळे टीम इंडियाचा विजय झाला. मात्र सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिलकडून (Shubman Gill) अपेक्षित कामगिरी झाली नाही. 

फिल्डींगमध्येही गिल झाला फेल

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना शुभमन गिलने (Shubman Gill) आज दोन सोप्पे कॅच सोडून दिले. हे कॅच सोडल्यामुळे शुभमनला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं. दरम्यान यावेळी शुभमन स्वतःवरही संतापलेला दिसला. इतकंच नाही तर त्याने स्वतःला केलेली शिवीगाळ देखील कॅमेरात कैद झाली आहे. 

ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 30 व्या ओव्हरमध्ये घटना घडली. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर गिलने मार्कस स्टॉइनिसचा कॅच सोडला. बॅटला कट लागून बॉल गिलकडे पोहोचला होता. मात्र त्याला कॅच घेता आला नाही. या घटनेनंतर शुभमन गिल (Shubman Gill) स्लिपवर उभा असताना स्वतःला शिवीगाळ करताना दिसला. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गिल स्वतःवरच संतापलेला दिसतोय.

भारताचा वनडे सामन्यात विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे सिरीज सुरु असून टीम इंडियाने या सिरीजची सुरुवात विजयाने केलीये. 189 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 39 रन्सवर टीम इंडियाने 4 विकेट्स गमावल्या. आजच्या सामन्यात शुभमन गिल चांगली कामगिरी करेल अशी, अपेक्षा होती मात्र तो देखील फेल ठरला. 31 बॉल्समध्ये त्याला अवघे 20 रन्स करता आली.

दरम्यान सामन्यामध्ये एक वेळ अशी आली होती की, टीम इंडियाचा पराभव होईल असं वाटत होतं. मात्र त्यावेळी एका बाजूने केएल राहुलने डाव सांभाळला आणि टीमला विजय देखील मिळवून दिला. केएल राहुलने 91 बॉल्समध्ये 75 रन्सची मॅचविनिंग नाबाद इनिंग खेळली.